‘हिंदु टास्क फोर्स’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भाईंदर – मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ च्या अंतर्गत असलेल्या काशिगावातील हजरत गौर शाह बाबाचा दर्गा आणि मशीद अनधिकृत असल्याचे सांगत त्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार अन् पालिका आयुक्त संजय काटकर यांच्याकडे केली. ही बांधकामे तात्काळ हटवावीत, अन्यथा या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करू, अशी चेतावणी अधिवक्ता खंडेलवाल यांनी दिली.
संपादकीय भूमिकाअशी मागणी करण्याची वेळ अधिवक्त्यांवर का येते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? |