|
तळोजा (पनवेल) : तळोजा (फेज १) मधील आयशा उपाहारगृहाच्या मागील जागेत अवैध मदरसा चालवला जात असून या उपाहारगृहाच्या आजूबाजूलाही अवैध बांधकाम केले आहे. स्थानिक नागरिकांनी याविषयी तक्रारी केल्यावर या अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन देऊन केली आहे.
१. या उपाहारगृहात नमाज पढण्यासाठी सुविधा आहे. येथील मालकाने अवैध बांधकाम करून बाहेरील जागेत स्वयंपाकघर, तसेच पदपथावर अवैध बांधकाम केले आहे, तसेच अवैधपणे स्वच्छतागृह बांधले आहे. येथे उपाहारगृह चालवण्याच्या नावाखाली मदरसा चालवला जात असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत.
२. त्या अनुषंगाने अवैध बांधकामाच्या संदर्भातील छायाचित्रे, तसेच व्हिडिओसुद्धा उपलब्ध झाले आहेत. याविषयी तक्रारी करणार्यांना मालकाकडून धमकावले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेकडे केली आहे. (उपाहारगृहाच्या मागे-पुढे इतके मोठे अतिक्रमण होत असतांना पोलीस झोपले होते का ? यासाठी स्थानिक आमदाराला हस्तक्षेप करावा लागतो, हे पोलीस यंत्रणेला लज्जास्पद ! – संपादक)
३. पोलीस येथे आठवड्यातून एकदा येऊन लाचखोरी करतात. त्यामुळेच मुसलमानांचे फावते. (पोलिसांच्या अशा भ्रष्ट मनोवृत्तीमुळेच मागेही एकदा तळोजामध्ये धर्मांधांनी सक्रीय होऊन सोसायटीच्या आवरात दिवाळीत हिंदूंना दिवे लावण्यास मज्जाव केला होता, हेही लक्षात घेणे आवश्यक ! – संपादक) तळोजा परिसरात एक-दोन ठिकाणी सोसायटींच्या गाळ्यांमध्ये भाड्याने जागा घेऊन तेथेच मुसलमान येतात आणि तेथे नमाज पढतात. आखाती देशांमधून या उपाहारगृहाला देणगी मिळते, अशीही नागरिकांमध्ये चर्चा होत असल्याचे समजते. (असे असेल, तर या प्रकरणाचीही सखोल चौकशी व्हायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिकामदरशाचे अवैध बांधकाम होत असल्याचे प्रशासन किंवा पोलीस कुणाच्याही लक्षात कसे आले नाही ? ते लक्षात आल्यावरही वेळीच कारवाई का केली नाही ? स्थानिकांना याविषयी तक्रार का करावी लागते ? |