विवाहासाठी धर्मांतर करायला लावणे मान्य करता येणार नाही ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी देहली – देशात चालू असलेल्या सामूहिक धर्मांतराच्या घटना थांबायला हव्यात. विवाहासाठी धर्मांतर करायला लावणे मान्य करता येणार नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश सरकारांनी केलेल्या लव्ह जिहादविरोधी कायद्याचे समर्थन केले. ते एका मुलाखतीत बोलत होते.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, आमचे म्हणणे आहे की, धर्मांतर व्हायलाच कशाला हवे ? मी पहातो आहे अनेक ठिकाणी सामूहिक धर्मांतर होत आहेत. हे थांबले पाहिजे. विवाहासाठी धर्मांतर करायला लावणे, याला मी वैयक्तिकदृष्टीने योग्य मानत नाही. तुम्ही अनेक प्रकरणे पाहिली असतील की, बलपूर्वक, आमीष दाखवूनही धर्मांतर केले जाते. स्वाभाविकपणे विवाह होणे आणि बळजोरी करून, आमीष दाखवून, धर्मांतर करायला लावून विवाह करणे, या दोन्हींमध्ये फार मोठे अंतर आहे. मला वाटते राज्य सरकारांनी जो कायदा बनवला आहे, तो या सर्व गोष्टी पाहूनच बनवलेला आहे. मी हे मानतो की, जो खरा हिंदु आहे तो जात-पात किंवा धर्माच्या आधारावर कधीच भेदभाव करणार नाही.