पुलवामामध्ये पोलीस उपनिरीक्षकाची आतंकवाद्यांकडून हत्या  

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक !

काश्मीरमध्ये जिहादी संघटनेच्या संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या ३२३ शाळा बंद करण्याचा आदेश

जम्मू-काश्मीर प्रशासनाने बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’शी संबंधित असलेल्या ‘फलाह-ए-आम ट्रस्ट’कडून चालवण्यात येणार्‍या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे.

काश्मीरमध्ये मे मासात काश्मिरी मुसलमान तरुणांची आतंकवादी होण्याच्या संख्येत वाढ !

या वर्षातच सुरक्षादलांनी १०० आतंकवाद्यांना ठार केले, त्यांपैकी मे मासातच २८ आतंकवादी मारले गेले आहेत. त्यामुळे केवळ आतंकवाद्यांना ठार करून आतंकवाद संपणार नाही, तर तो जिहादसारख्या मूळ विचारांना नष्ट करूनच संपवावा लागणार !

(म्हणे) ‘भारताने काश्मिरींच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करू नये !’

काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. त्या संदर्भात भारताने काय करावे आणि काय करू नये, हे जर्मनीने भारताला सांगण्याच्या भानगडीत पडू नये, अशा शब्दांत भारताने जर्मनीच्या राजदूतांना सुनावले पाहिजे !

काश्मीरप्रश्‍नी भारताला विरोध करणार्‍या देशांकडे भारताने लक्ष देऊ नये ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

‘ज्या देशांनी अनेक वर्षे काश्मीरच्या आणि अन्यही प्रकरणांत भारताच्या विरोधात विधाने केली आहेत, त्यांच्याकडे भारताने लक्ष देऊ नये’.

अमित शहा यांचे त्यागपत्र मागणे आवश्यक झाले आहे ! – भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असल्याने आणि तरीही प्रतिदिन एका काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली जात असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यागपत्र देण्याची मागणी करणे आवश्यक झाले आहे.

काश्मीरमधील हिंदूंच्या वारंवार होणार्‍या हत्यांसंदर्भात मान्यवरांच्या प्रतिक्रिया !

नरेंद्र मोदी शासनाने आतंकवादाविरुद्ध लढा देण्याची वेळ आली आहे. आता मुसलमानांनीही आतंकवादाच्या विरोधात बोलून हिंदूंच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे.

हिंदूंचा वंशविच्छेद चालूच !

फुटकळ आतंकवादी अण्वस्त्रधारी देशाला भारी पडत असतील, तर हे चित्र सरकारला अत्यंत लज्जास्पद आहे. हा आतंकवाद आपण अजून कधीपर्यंत चालू देणार आहोत ? आणखी किती निरपराध हिंदूंच्या हत्या होऊ देणार आहोत ? हे सरकारला ठरवावे लागेल आणि सरकार तसे करत नसेल, तर हिंदूंनी त्यांना तसे करण्यास भाग पाडावे. ती तरी लोकशाही ठरेल !

यासीन मलिक याचे समर्थन करणार्‍या इस्लामी देशांच्या संघटनेचा भारताकडून निषेध

‘ओआयसी-आय.पी.एच्.आर्.सी.’ या इस्लामी देशांच्या संघटनेने आतंकवादी कारवायांचे समर्थन केल्याचे भारताने म्हटले आहे. या संघटनेने कुठल्याही प्रकारे आतंकवादाचे समर्थन करू नये, असेही आवाहन भारताने केले आहे.

बारामुल्ला येथे ३ पाकिस्तानी आतंकवादी ठार

बारामुला येथे सुरक्षादलांनी जैश-ए-महंमदच्या ३ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्या जवळ शस्त्रसाठा मिळाला. यावर्षी आतापर्यंत २२ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे.