Ex-Home Minister’s Confession : मी गृहमंत्री असतांना मला श्रीनगरमधील लाल चौकात जाण्‍याची भीती वाटत होती ! – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

तत्‍कालीन काँग्रेस सरकारमधील केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची स्‍वीकृती

नवी देहली – मी गृहमंत्री असतांना मला श्रीनगरमधील लाल चौक आणि दल सरोवर येथे जाण्‍याची भीती वाटत होती, अशी स्‍वीकृती डॉ. मनमोहन सिंह सरकारमध्‍ये गृहमंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. नवी देहलीतील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’मध्‍ये ९ सप्‍टेंबरला झालेल्‍या त्‍यांच्‍या ‘फाइव्‍ह डिकेड्‍स ऑफ पॉलिटिक्‍स’ या पुस्‍तकाच्‍या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गेे, दिग्‍विजय सिंह आणि शिक्षणतज्ञ विजय धर हे उपस्‍थित होते. धर हे शिंदे यांचे सल्लागारही होते.

‘फाइव्‍ह डिकेड्‍स ऑफ पॉलिटिक्‍स’ या पुस्‍तकाचे लोकार्पण करतांना सुशीलकुमार शिंदे (डावीकडून तिसरे) आणि इतर

पुस्‍तकाला शरद पवार यांची प्रस्‍तावना !

शिंदे यांचे पुस्‍तक २४० पानी असून त्‍यांनी एकूण ८ विभागांत त्‍यांच्‍या राजकीय कारकीर्दीतील विविध विषयांवरचे लेखन केले आहे. या पुस्‍तकाला शरद पवार यांची प्रस्‍तावना आहे, तर सोनिया गांधी यांनीही शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. ५ दशकांच्‍या राजकीय कारकीर्दीचे हे इंग्रजी आणि हिंदी पुस्‍तक सुशीलकुमार शिंदे यांनी त्‍यांच्‍या राजकीय वारसदार, सोलापूरच्‍या काँग्रेसच्‍या खासदार कन्‍या प्रणिती शिंदे यांना अर्पण केले आहे.

संपादकीय भूमिका 

  • गृहमंत्र्यांनाच जेथे भीती वाटते, तेथे सर्वसामन्‍यांचे काय ?
  • शिंदे यांची ही स्‍वीकृती म्‍हणजे काँग्रेसच्‍या ५५ वर्षांच्‍या सत्तेच्‍या कारकीर्दीतील तिच्‍या पराभूत मानसिकतेची पोचपावतीच होय ! कणखर मनाचे नव्‍हे, तर असे नेभळट गृहमंत्री मिळणे, हे जनतेचे दुर्दैव !
  • काँग्रेसने उभी हयात मुसलमानांचे लांगूलचालन करूनही तिच्‍या नेत्‍यांना मुसलमानबहुल श्रीनगरमधील लाल चौकात जायला भीती वाटणे, हे मुसलमानांपासून काँग्रेसही सुरक्षित नसल्‍याचे द्योतक !