पिंपरी (पुणे) येथे तडीपार गुन्हेगाराकडून ९ किलो गांजा जप्त !

आरोपीवर वर्ष २०२४ मध्ये २ आणि आता १ गुन्हा नोंद

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (जिल्हा पुणे) – चर्‍होली येथील दाभाडे सरकार चौकात अमली पदार्थविरोधी पथकाने भरत वाघमारे या तडीपार गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून ९ किलो ४७८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. त्याच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी भरत वाघमारे याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात वर्ष २०२४ मध्ये २ आणि खडक पोलीस ठाण्यात १ गुन्हा नोंद आहे.

साहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी दिघी पोलीस ठाण्याच्या परिसरातील चर्‍होली बुद्रुक परिसरामध्ये गस्त घालत होते. त्या वेळी त्यांना चौकाजवळ एक व्यक्ती दुचाकीवर पांढरे हिरवे रंगाचे नायलॉनचे पोते ठेऊन संशयितरित्या थांबलेली दिसली. पोलिसांनी त्याला कह्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तडीपार केले असल्याचे निदर्शनास आले.