कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील घटनेतील दोषींवर आजच कारवाई करू ! – उदय सामंत, मंत्री

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यूसंबंधातील अहवाल प्राप्त झाला आहे. घटना घडली तेव्हा साहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापक त्या ठिकाणी उपस्थित असायला हवे होते; ते त्या ठिकाणी नव्हते.

‘वारणाली मल्टी स्पेशालिटी रुग्णालया’स ३ कोटी रुपयांचा निधी ८ दिवसांमध्ये वर्ग करू ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी ‘वारणाली मल्टी स्पेशालिटी रुग्णालया’च्या बांधकामासाठीचे ३ कोटी रुपये ८ दिवसांमध्ये वर्ग करू, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांत सुविधांअभावी आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा !

नागपूर येथे ७ डिसेंबरपासून चालू झालेल्या हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक प्रश्न आरोग्य विभागाचे असतात. वारंवार मागणी करूनही शासकीय रुग्णालयांतील प्रश्न ‘जैसे थे’ रहात असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांतील आमदार हतबल झाल्याचे दिसून आले.

रुग्णालयातील परिचारकांच्या संपामुळे ससूनमध्ये दिवसभरात केवळ आठच शस्त्रक्रिया !

या संपामुळे रुग्णांची झालेली हानी कोण आणि कशी भरून काढणार ?

राज्यांतील शासकीय रुग्णालयांत पुरेसा औषधसाठा ! – वैद्यकीय शिक्षणमंत्री

नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील, तसेच कळवा (जिल्हा ठाणे) येथील शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यांतील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिली.

पुणे येथे वाय्.सी.एम्. रुग्णालयात रुग्णांच्या देयकांच्या बनावट पावत्या बनवून ६८ सहस्र रुपयांचा अपहार !

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वाय्.सी.एम्.) रुग्णालयात वेगवेगळ्या विभागांच्या ‘कॅश काउंटर’वर (पैसे देवाण-घेवाणीसाठी केलेली व्यवस्था) नेमलेल्या कामगाराने रुग्णांच्या देयकांच्या बनावट पावत्या सिद्ध करून ६८ सहस्र रुपयांचा अपहार केला.

गरोदर महिलेचा मृत्यू आणि असंवेदनशील आरोग्य विभाग !

आमदारांनी उपस्थित केलेले सर्वच प्रश्न गंभीर असून आरोग्य विभागाची दु:स्थिती दाखवणारे आहेत. यामुळे ‘आरोग्य यंत्रणा रुग्णांना जगवण्यासाठी कि मारण्यासाठी ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने या प्रकरणात गंभीर लक्ष देणे आवश्यक आहे.

कंत्राटदाराने कंत्राट संपूनही घेतले वाहनचालकांकडून शुल्क !

कंत्राटाची मुदत संपून १ वर्ष उलटून गेल्यावरही शुल्काद्वारे लुबाडणार्‍या कंत्राटदाराकडून सर्व रक्कम वसूल करायला हवी !

जागेचे आरक्षण पालटण्यात न आल्यामुळे मीरा भाईंदर येथील कर्करोग रुग्णालयाचे बांधकाम रखडले !

कर्करोग रुग्णालयाचे बांधकाम भूमीपूजन होऊनही ६ मास रखडणे, ही प्रशासनाची असंवेदनशीलता दर्शवते !

सांगली सामान्य रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधांसाठी १० कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान देऊ ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

सांगली सामान्य (सिव्हिल) रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन आणि एम्.आर्.आय. ही दोन्ही यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी ८ कोटी रुपयांचे अनुदान संमत करण्यात आले होते; मात्र या दोन्ही यंत्रांसाठी एकूण १० कोटी ३० लाख रुपयांचा व्यय आहे.