आणंद (गुजरात) – येथे कर्णावती-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पातील बांधकाम चालू असतांना एक पूल कोसळून ३ कामगारांचा मृत्यू झाला. तसेच अनेक कामगार ढिगार्याखाली अडकले. अपघाताची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोचले अन् त्यांनी बचावकार्य चालू केले. आतापर्यंत ४ कामगारांना ढिगार्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.