पुणे येथील पहिले कोरोनाबाधित दांपत्य ठीक झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडले

कोरोनाचे शहरातील पहिले रुग्ण ठरलेल्या दांपत्याची दुसरी चाचणीही ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना रुग्णालयातून २५ मार्चला ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ९ मार्चला नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

कस्तुरबा रुग्णालयातील १२ संशयितांना कोरोनाची लागण नसल्याचे निष्पन्न

येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात कोरोनाबाधित म्हणून उपचार चालू असलेल्या रुग्णांच्या दुसर्‍यांदा घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये १२ जणांना कोरोनाची लागण नसल्याचे आढळून आले आहे.