HMPV Virus In India : देशात एच्.एम्.पी.व्ही.चे एकूण ८ रुग्ण
देशात ‘ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस’चे (एच्.एम्.पी.व्ही.चे) आतापर्यंत ८ रुग्ण आढळून आले आहेत. नागपूर येथे २ रुग्ण आढळले आहेत. यात १३ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे. दोघांनाही रुग्णालयात प्रविष्ट (दाखल) करावे लागले नसले, तरी घरी उपचार घेऊन त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे.