Insults Towards India : ‘बांगलादेशी रुग्‍णांवर उपचार करणार नाही ! – जे.एन्. रे रुग्‍णालय, कोलकाता

  • कोलकाता (बंगाल) येथील जे.एन्. रे रुग्‍णालयाचा अभिनंदनीय निर्णय

  • कोलकाता येथील अन्‍य आरोग्‍य केंद्रांनीही असा निर्णय घेण्‍याचे आवाहन !

कोलकाता (बंगाल) – बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्‍या अत्‍याचारांच्‍या पार्श्‍वभूमीवर कोलकाता येथील माणिकतला परिसरातील जे.एन्. रे रुग्‍णालयाने ‘यापुढे त्‍यांच्‍या रुग्‍णालयात बांगलादेशी रुग्‍णांवर उपचार करणार नाही’, असे घोषित केले आहे.

बांगलादेशी नागरिकांनी भारतीय राष्‍ट्रध्‍वजाचा अनादर केल्‍याच्‍या घटनेनंतर हा निर्णय घेण्‍यात आल्‍याचे रुग्‍णालयाचे अधिकारी सुभ्रांशु भक्‍त यांनी सांगितले. ते पुढे म्‍हणाले की, आम्‍ही अधिसूचना प्रसारित केली आहे की, आम्‍ही आजपासून कोणत्‍याही बांगलादेशी रुग्‍णाला उपचारांसाठी अनिश्‍चित काळासाठी भरती करणार नाही.

बांगलादेशाच्‍या स्‍वातंत्र्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली; परंतु असे असूनही आपण त्‍यांची भारतविरोधी भावना पहात आहोत. आम्‍हाला आशा आहे की, इतर रुग्‍णालयेही आम्‍हाला पाठिंबा देतील आणि अशीच पावले उचलतील, असे आवाहनही त्‍यांनी केले.

संपादकीय भूमिका

भारतात प्रथमच कुणीतरी बांगलादेशातील हिंदूंसाठी कृतीच्‍या स्‍तरावर निर्णय घेतला आहे. याचा आदर्श घेत हिंदू विविध निर्णय घेऊ शकतात, असेच वाटते !