हिंदु साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मरण करून  हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुन्हा जागवूया ! – सुनील घनवट, महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापले, तर पेशव्यांच्या काळात हिंदवी साम्राज्याचा विस्तार झाला. त्याच हिंदु साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मरण करून हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुन्हा जागवूया, असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट यांनी केले.

(म्हणे) ‘सिंधु संस्कृतीच्या आहारात गोमांसाचे सेवन अधिक होते !’ – संशोधनातील माहिती

हिंदु गायीला ‘माता’ मानतात, हा इतिहास आणि वर्तमान आहे. असे असतांना इतिहासामध्ये गोमांस भक्षण करत असल्याचे सांगणे ही लबाडीच आहे ! सरकारने या संशोधनातील फोलपणा समोर आणून सत्य समोर आणणे आवश्यक !

पंढरपूर पालखी मार्गावरील वाखरी येथील प्राचीन बाजीराव विहीर जतन करण्यास यश !

पंढरपूर-पुणे पालखी महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग करण्याचे काम चालू आहे. हे काम करतांना वाखरी-भंडीशेगाव दरम्यान असलेल्या बाजीराव विहिरीचा अडथळा येत असल्याने ती बुजवण्याचे काम चालू होते. ही विहीर ऐतिहासिक असल्याने ती बुजवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला.

कुतुब मीनार परिसरातील मशीद ही २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आल्याने ती हटवावी ! – देहली येथील न्यायालयात याचिका

जे सरकारने करायला हवे, त्यासाठी हिंदूंना न्यायालयात याचिका करून न्यायालयीन लढा द्यावा लागतो, हे अपेक्षित नाही !

न्यायाची प्रतीक्षा !

मंदिरे गाडून मशिदी उभारल्याने भक्त आणि ईश्‍वर यांच्यावर झालेला अन्याय दूर होण्यासाठी आज धर्मनिष्ठ हिंदू अन् अधिवक्ते प्राणपणाने लढत आहेत. हिंदूंची मंदिरे पुन्हा त्यांना मिळावीत, यासाठी सरकारने आता कृतीशील व्हावे, हीच हिंदूंची अपेक्षा !

हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

देहलीतील कुतुब मिनार परिसरात असलेली मशीद २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आली असून तेथे पुन्हा मंदिरांची पुनर्उभारणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

पर्यावरणाचे संरक्षण कवच : अग्निहोत्र

पंचमहायज्ञांतील एक भाग अग्निहोत्र आहे. देवयज्ञ किंवा अग्निहोत्र केल्याने वायू, वृष्टी आणि जल यांची शुद्धी होते, तसेच चांगली वृष्टी होऊन संपूर्ण जगाला सुख प्राप्त होते. कालांतराने यज्ञ हा शब्द अग्निहोत्र यासाठी रूढ झाला. वेद आणि वैदिक संस्कृती इतकाच अग्निहोत्राचा इतिहासही प्राचीन आहे.

गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर ५९ वर्षांनंतर अशी मागणी करावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘गोव्याच्या कुंकळ्ळीवासियांनी ४३७ वर्षांपूर्वी कुंकळ्ळी येथे पोर्तुगीज सत्तेला आव्हान दिले. कुंकळ्ळी येथील विरांनी स्वराज्यासाठी लढा दिल्याच्या कृतीचा कुंकळ्ळीवासियांना अभिमान आहे. १६ महानायकांच्या हौतात्म्याचा इतिहास जगापुढे येण्याची आवश्यकता आहे