गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर ५९ वर्षांनंतर अशी मागणी करावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘गोव्याच्या कुंकळ्ळीवासियांनी ४३७ वर्षांपूर्वी कुंकळ्ळी येथे पोर्तुगीज सत्तेला आव्हान दिले. कुंकळ्ळी येथील विरांनी स्वराज्यासाठी लढा दिल्याच्या कृतीचा कुंकळ्ळीवासियांना अभिमान आहे. भारतातील परकीय सत्तेच्या विरोधातील हा पहिला लढा आहे. १६ महानायकांच्या हौतात्म्याचा इतिहास जगापुढे येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कुंकळ्ळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुकोरिना कुतिन्हो यांनी केले.’ ख्रिस्ती धर्म गोमंतकीय हिंदूंवर लादण्याच्या पोर्तुगिजांच्या प्रयत्नांना कडाडून विरोध करणार्‍या कुंकळ्ळी गावातील १६ पुढार्‍यांना १५ जुलै १५८३ या दिवशी पोर्तुगिजांनी विश्‍वासघाताने ठार मारले होते.’