पर्यावरणाचे संरक्षण कवच : अग्निहोत्र

अ. पंचमहायज्ञ : पुढीलप्रमाणे पंचमहायज्ञ आहेत.

१. ब्रह्मयज्ञ किंवा ऋषियज्ञ

२. देवयज्ञ किंवा अग्निहोत्र

३. पितृयज्ञ

४. बलिवैश्‍वेदेव यज्ञ किंवा भूतयज्ञ

५. नृयज्ञ किंवा अतिथी यज्ञ

वेदांनी सांगितलेले पंचमहायज्ञ दैनंदिन जीवनात आचरणात आणल्यास व्यक्ती आणि समाज यांचे जीवन सुखकर होईल.

आ. वेद आणि वैदिक संस्कृतीप्रमाणे अग्निहोत्राचा इतिहासही प्राचीन : पंचमहायज्ञांतील एक भाग अग्निहोत्र आहे. देवयज्ञ किंवा अग्निहोत्र केल्याने वायू, वृष्टी आणि जल यांची शुद्धी होते, तसेच चांगली वृष्टी होऊन संपूर्ण जगाला सुख प्राप्त होते. कालांतराने यज्ञ हा शब्द अग्निहोत्र यासाठी रूढ झाला. वेद आणि वैदिक संस्कृती इतकाच अग्निहोत्राचा इतिहासही प्राचीन आहे.

इ. प्रदूषणाच्या शमनाचे उपकरण म्हणजे अग्निहोत्र ! : अग्निहोत्र आदिकालापासूनच मनुष्याच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये संध्येच्या रूपात अंतर्भूत झाला आहे. मनुष्याच्या शास्त्रविहित कर्मामुळे प्रकृतीमध्ये जे प्रदूषण होते, त्याच्या शमनाचे उपकरण अग्निहोत्र आहे. शुद्ध गायीचे तूप आणि इतर साहित्य वापरून केलेल्या अग्निहोत्रातून उत्पन्न झालेल्या धुराने वायूचे शुद्धीकरण होऊन हानीकारक विषाणूंचा नाश होतो, हे वर्तमान वैज्ञानिक अन्वेषणाद्वारे सिद्ध झाले आहे.

– अधिवक्ता नवीन कुमार, नयापुरा, सोजतनगर, राजस्थान

(संदर्भ : मासिक ‘गीता स्वाध्याय’,मार्च २०१६)