छत्रपती संभाजीनगर येथे गणेशोत्सव मंडळांचा धार्मिक देखाव्यांवर भर !

गेल्या अनेक वर्षांपासून देखाव्यांची परंपरा जपणार्‍या शहरातील जुन्या गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी धार्मिक देखाव्यांवर भर दिला आहे. मंडळांनी अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर, केदारनाथचा आदियोगी, चंद्रयान, शिवराज्याभिषेकाचे देखावे सिद्ध केले आहेत.

पुणे येथे गणेशोत्सवाच्या गर्दीत भ्रमणभाष चोरट्यास अटक !

जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवातही चोरी केली जात आहे, हे दुर्दैवी !

पुणे येथे फिरत्‍या विसर्जन हौदांना नागरिकांचा अल्‍प प्रतिसाद !

‘फिरता विसर्जन हौद आला अन् निघून गेला’, अशी अवस्‍था असल्‍याने त्‍यास नागरिकांचा अधिक प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्‍हणजे अशी व्‍यवस्‍था करण्‍याची अट निविदेतही दिलेली नाही.

सातारा येथे घरगुती श्री गणेशमूर्तींचे वहात्‍या पाण्‍यात विसर्जन करण्‍याकडे भाविकांचा कल !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने संगम माहुली येथील नदीकाठी भाविकांचे प्रबोधन करण्‍यात येत होते. या प्रबोधनामुळे अनेक भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे वहात्‍या पाण्‍यात विसर्जन केले.

‘निविदा संस्‍कृती’ जपण्‍यासाठीच सातारा नगरपालिकेचे कृत्रिम तलावांना प्राधान्‍य !

विसर्जनास बंदीचे फलक सातारा शहरातील नैसर्गिक जलस्रोतांच्‍या बाहेर झळकावण्‍यात आले.सातारा नगरपालिका कृत्रिम तलावांनाच प्राधान्‍य का देत आहे ? हा प्रश्‍न सातारावासियांनाही भेडसावत आहे.

शास्‍त्रसंमत विसर्जनाचा आग्रह ! Ganesh Visarjan

पर्यावरणाच्‍या नावाखाली शास्‍त्र पालन करण्‍यास सहस्रो हिंदूंना विरोध करण्‍याचे, त्‍यातून धर्महानी करण्‍याचे मोठे पाप प्रशासनाला लागत आहे, हे त्‍यांनी लक्षात घ्‍यावे. हिंदूंना प्रशासनाने केलेली त्‍यांची दिशाभूल आता कळून चुकत असल्‍याने ते स्‍वयंस्‍फूर्तीने शास्‍त्रानुसार विसर्जनाचाच आग्रह धरत आहेत, हे चांगले लक्षण आहे !

परराज्यातून आणलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पुजून शासनाच्या एका चांगल्या योजनेची थट्टा उडवली जात आहे ! – प्रा. राजेंद्र केरकर Ganesh Visarjan

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर कित्येक वर्षे बंदी असूनही त्या वापरल्या जाणे प्रशासनासाठी लज्जास्पद !

सावधान ! आपल्या घरी गणरायासह हलाल उत्पादने तर येत नाहीत ना ? Ganeshotsav

प्रत्येक क्षेत्रामध्ये पसरत असलेल्या या घातक हलाल षड्यंत्रापासून हिंदूंचे पवित्र सण-उत्सवही सुटू शकले नाहीत ! अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत जगाचा विनाश करू पहाणार्‍या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…?

विदेशातील श्री गणेशाची देवस्थाने आणि त्यांची वैशिष्ट्ये !

सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने…

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र Ganeshotsav

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !