डफळापूर (जिल्‍हा सांगली) येथील मूर्तीविक्रेत्‍यांकडून दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक भेट !

येथील मूर्तीविक्रेते श्री. रोहित वाठारे आणि श्री. आशिष मोहिते यांनी हिंदु, तसेच गणेशभक्‍तांना शास्‍त्र समजावे; म्‍हणून दैनिक ‘सनातन प्रभात’चा श्री गणेशचतुर्थी विशेषांक प्रत्‍येक मूर्तीसमवेत भेट दिला. त्‍यांनी ४५० अंकांचे वितरण केले.

भोर (पुणे) येथील गणेशोत्‍सवाला ‘शिवकालीन’ ३०० वर्षांची परंपरा !

येथील शिवापुरी आळीतील फडणीस वाड्यामध्‍ये ‘शिवकालीन’ काळापासून ‘गणेशजन्‍म सोहळ्‍या’ची परंपरा आजही राखली जाते. सुमारे ३०० वर्षांपूर्वीची ही परंपरा फडणीसांची १८ वी पिढी पारंपरिक पद्धतीने साजरी करते.

Ganeshotsav : सार्वजनिक गणेशोत्‍सवाचे पालटते स्‍वरूप आणि योग्‍य दिशा !

आपल्‍या संस्‍कृतीला शोभतील, अशाच स्‍वरूपात उत्‍सव साजरे करायला हवेत. कुठलेही अपप्रकार घडणार नाहीत किंवा अपप्रवृत्तींचा शिरकाव होणार नाही, याचे भान ठेवायला हवे. सण, उत्‍सव हे सर्वच आपल्‍या हिंदु संस्‍कृतीचा ठेवा आहेत.

सोलापूर येथे हलालमुक्‍त गणेशोत्‍सव साजरा होण्‍यासाठी प्रयत्न करणार !

हिंदूंच्‍या कष्‍टाचा पैसा ‘हलाल प्रमाणपत्रा’च्‍या माध्‍यमातून आतंकवाद्यांसाठी वापरला जात आहे. त्‍यामुळे हलाल प्रमाणित वस्‍तू खरेदी करू नयेत, यासाठी शहरातील प्रत्‍येक हिंदु कुटुंबाची जनजागृती करण्‍याचा निर्धार येथील पुरोहितांनी संघटितपणे केला.

शास्‍त्रीय पद्धतीने आदर्श गणेशोत्‍सव करणारी मिरज येथील विद्या मंदिर प्रशाला ! 

मिरज येथील विद्या मंदिर प्रशालेत गेली काही वर्षे शास्‍त्रीय पद्धतीने आणि पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा केला जातो. शाळेतील शिक्षिका सौ. श्‍वेता सुनील वसगडे आणि विद्यार्थी यांनी शाडू मातीची श्री गणेशमूर्ती सिद्ध केली आहे, तसेच बाजूची सजावट नैसर्गिकरित्‍या सिद्ध करण्‍यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे ३०० विद्यार्थ्‍यांनी बनवल्‍या ‘इको फ्रेंडली’ श्री गणेशमूर्ती !

शहरातील ‘साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळा’च्‍या नरसिंहपूर साधना पाटील प्राथमिक विद्यालय आणि शहरातील साने गुरुजी माध्‍यमिक विद्यालय येथे ‘इको फ्रेंडली बाप्‍पा बनवा’ (पर्यावरणपूरक) या कार्यशाळा आणि कार्यशाळेत बनवलेल्‍या श्री गणेशमूर्तींचे प्रदर्शन नुकतेच त्‍या-त्‍या शाळेच्‍या प्रांगणात पार पडले.

पुण्‍यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरासमोर ३५ सहस्र महिलांनी केले अथर्वशीर्षाचे पठण ! Ganeshotsav

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरासमोर २० सप्‍टेंबर या दिवशी ३५ सहस्र महिलांनी श्री गणेश अथर्वशीर्षाचे पठण केले. प्रतिवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येते.

श्री गणरायाला साकडे !

देवा श्री गणेशा, तू गणांचा अधिपती आहेस ! तू दुःखहर्ता आहे आणि सुखकर्ता आहेस. पूजेत तुला पहिला मान आहे; कारण तुझ्‍या स्‍मरणमात्रे दाही दिशा मोकळ्‍या होतात आणि पूजेतील ती ती देवता पूजेच्‍या ठिकाणी येऊ शकते !

सध्‍याच्‍या गणेशोत्‍सवाचे स्‍वरूप आणि समाजात नैतिक परिवर्तनाची नितांत आवश्‍यकता !

‘सध्‍याच्‍या गणेशोत्‍सवाचे स्‍वरूप पहाता ‘लोकमान्‍य टिळकांचे दूरदर्शीत्‍व आणि त्‍यांची स्‍वप्‍ने यांना आपण तिलांजली तर देत नाही ना ?’, अशी शंकेची पाल चुकचुकल्‍या वाचून रहात नाही.

संभाव्‍य आतंकवादी आक्रमण, घातपाती कारवाया विचारात घेऊन पोलिसांकडून कडक बंदोबस्‍त !

हिंदूंच्‍या सण-उत्‍सवांवर अद्यापही आतंकवादी आक्रमणाचे सावट असणे, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद !