प्रदूषणाच्‍या नावाखाली गणेशोत्‍सवच नव्‍हे, तर अनेक सण-उत्‍सवांवर बंधने आणण्‍याचे षड्‍यंत्र ! – अधिवक्‍ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्‍कृती अभ्‍यासक

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘गणेशोत्‍सवामुळे जलप्रदूषण होते का ?’

नवी मुंबईमध्ये ६३ वर्षे ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा कायम राखणारे आग्रोळी गाव ! Ganeshotsav

गणेशोत्सवाच्या या काळामध्ये १० दिवस मंदिरात संपूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणे वावरत असते. आजही गावामध्ये ‘एक गाव एक गणपति’प्रमाणे ‘एक गाव एक होळी’, ‘एक गाव एक दहीहंडी’, तसेच अन्य सर्व उत्सव एकत्रपणे साजरे केले जातात.

श्री गणेशाची आध्यात्मिक माहिती Ganesh

श्री गणेश आणि २१ संख्या, श्री गणेशाला पहिला नमस्कार का ? आणि अंगारकीचे विशेष महत्त्व या संदर्भातील आध्यात्मिक माहिती पाहूया !

श्री गणेशाची १२ नावे, त्यांची स्थाने आणि त्याच्या पूजेतील वस्तूंची कथा ! Ganesh / Ganapati

गणेश म्हणजे पवित्र प्रतिक. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लक्षावधी हिंदू शेकडो वर्षे सर्व मंगल कार्य गणेशाच्या साक्षीने करत आले आहेत. त्याच्या चरणी भावपूर्ण वंदन !

पुणे येथे गणेशोत्सवाच्या ५ व्या दिवशी ९५ सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

गणेशोत्सवाच्या ५ व्या दिवशी शहरामध्ये ९५ सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये बांधलेल्या हौदांमध्ये १७ सहस्र ६६२, लोखंडी हौदांमध्ये ५९ सहस्र ३००, तर फिरत्या हौदांमध्ये ४ सहस्र ४१, तर १३ सहस्र ७९२ श्री गणेशमूर्तींचे दान करण्यात आले. विर्सजनाच्या वेळी अनुमाने १ लाख २५ सहस्र किलो निर्माल्य गोळा करण्यात आले.

मिरजे येथे युवा अभियंत्याने श्री गणेशमूर्तीसमोर साकारला बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा !

थर्माकॉल आणि पुठ्ठे यांच्या माध्यमातून बनवलेली आकर्षक, नक्षीदार आणि कोरीव १२ मंदिरे लक्ष वेधून घेत आहेत. १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना आणि त्याचा महिमा देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.

कोकणातील गणेशोत्‍सवासाठी ९१७ बस पाठवल्‍याने मराठवाड्यातील प्रवाशांचे हाल !

राज्‍य परिवहन महामंडळाने मराठवाड्यातून एकूण ९१७ बस कोकणासाठी सोडल्‍या आहेत. त्‍यामुळे मराठवाड्यातील लांब पल्‍ल्‍याच्‍या आणि जिल्‍हाअंतर्गत बस सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. उत्‍सवाच्‍या पहिल्‍या दिवशी अनेकांची गैरसोय झाली आहे. 

पंचगंगेवर होणार्‍या आरतीसाठी हिंदुत्‍वनिष्‍ठांची उपस्‍थिती !

२३ सप्‍टेंबरला भाविकांनी प्रशासनाचे बंधन झुगारून देऊन उत्‍स्‍फूर्तपणे श्री गणेशमूर्तींचे पंचगंगेत विसर्जन केले. यानंतर पंचगंगा नदीवर प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता होणार्‍या पंचगंगेच्‍या आरतीसाठी तेथील भाविक श्री. स्‍वप्‍नील मुळे यांनी सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठांना आरतीसाठी उपस्‍थित राहून सहभागी होण्‍याविषयी विनंती केली.

पुणे येथील नाना-नानी उद्यानसमोरील कृत्रिम हौदाची विदारक स्‍थिती !

अत्‍यंत गढूळ पाणी आणि प्रचंड कचरा असलेला श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठेवलेला कृत्रिम हौद !

सोलापूर येथे छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍या भक्‍ताची पोलिसांकडून अडवणूक !

पोलिसांनी अशा प्रकारे कायद्याची कार्यवाही कधी अन्‍य धर्मियांच्‍या सणांच्‍या प्रसंगी केली आहे का ? हिंदूबहुल देशात आणखी किती काळ हिंदूंनीच त्‍यांच्‍या धार्मिक अधिकारांची गळचेपी सहन करायची ?