ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र Ganeshotsav

गणेशोत्सवाचा आनंद वृद्धींगत करणारी सनातनची प्रकाशने !

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा ! (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)

श्री गणपति अथर्वशीर्ष अन् संकष्टनाशनस्तोत्र (लघुग्रंथ)

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री गणेशस्तोत्राचे पठण केल्याने स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता लवकर साध्य होते अन् शरिराभोवती सूक्ष्म संरक्षक-कवच निर्माण होते. स्तोत्रातील संस्कृत भाषेमुळे उच्चारही सुधारतात. यासाठी नित्य गणेशस्तोत्राचे पठण करा अन् मुलांकडूनही करवून घ्या !


श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार कशी असावी ? (लघुग्रंथ)

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि मूर्तीकार-साधक सर्वश्री गुरुदास खंडेपारकर, राजू सुतार अन् रामानंद परब

श्री गणेशमूर्ती मातीची, लहान, पाटावर बसलेली अशी शास्त्रानुसार असेल, तर भाविकांना गणेशतत्त्वाचा खरा लाभ होतो. या दृष्टीने या लघुग्रंथात मूर्तीकार, भाविक आणि गणेशोत्सव मंडळे यांचे प्रबोधन केले आहे. सनातननिर्मित आदर्श मूर्तीची मापेही या लघुग्रंथात दिली आहेत.


‘श्री गणपति’ हा लघुग्रंथही उपलब्ध !

आरतीसंग्रह (अर्थासह) (लघुग्रंथ)

आरत्यांमध्ये असणारी संतांची प्रासादिक काव्यरचना, आरत्यांच्या वेळी होणारे गायन आणि वाद्यांची साथ यांमुळे भावनिर्मिती होते. अर्थ अन् भावार्थ समजून घेऊन आरत्या म्हटल्यास भाववृद्धी लवकर होते. या लघुग्रंथात अन्वय अन् अर्थ यांसह प्रामुख्याने उपास्यदेवतांच्या आरत्या दिल्या आहेत.


सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७