‘Hindu Rashtra’ Demonstration : कुंभनगरी येथील हिंदु जनजागृती समितीच्या कक्षाला भाविकांची गर्दी !

‘प्रभातकुंज’ आश्रमातील श्री. रामचरण दास आणि आश्रमातील भाविक प्रदर्शन पहातांना

प्रयागराज, २९ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्री कैलाशपुरी भारद्वाज मार्ग चौकाजवळ असलेल्या सेक्टर ६ मध्ये हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र’ प्रदर्शन उभारण्यात आले आहे. येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अनेक भाविक कक्षातील फलकांची माहिती जाणून घेत आहेत, तसेच प्रदर्शनाची छायाचित्रे आणि व्हिडिओसुद्धा काढत आहेत. ‘हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे’, ‘हिंदूंसाठी हिंदु राष्ट्र होणे आवश्यक आहे’, अशा प्रतिक्रिया येणार्‍या भाविकांनी व्यक्त केल्या.

प्रदर्शनाची माहिती घेतांना युवक
प्रदर्शनाच्या स्वागतकक्षावर अभिप्राय देण्यासाठी झालेली गर्दी
लहान मुलाने मराठीच्या सात्त्विक लिपीची वही उघडून लिहायला चालू केले तो क्षण

क्षणचित्रे

१. कक्षाला भेट देणार्‍या भाविकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे.

२. कक्षावर असलेल्या मराठीतील सात्त्विक लिपीची वही पाहून एका लहान मुलाने कक्षावरच अक्षरे लिहायला चालू केले.