निधर्मी लोकांमुळे देशाची स्थिती बिकट !

सध्या काश्मीरमध्ये सर्व मंदिरे उद्ध्वस्त झाली असून जी मंदिरे शिल्लक आहेत, त्यांना टाळे लावण्यात आले आहे. देशाची ही स्थिती निधर्मी लोकांमुळे झाली आहे. यावर उपाय म्हणून सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता असल्याचे मत एका सैनिकाने येथे व्यक्त केले.

माघ पौर्णिमेला कुंभपर्वात त्रिवेणी संगमावर दीड कोटी भाविकांनी केले भावपूर्ण वातावरणात स्नान

भाव-भक्तीचा संगम असलेल्या कुंभनगरीतील गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमामध्ये अनुमाने दीड कोटी भाविकांनी १९ फेब्रुवारी या दिवशी माघ पौर्णिमेला स्नान केले.

आझाद हिंद सेनेप्रमाणे संतसेना सिद्ध केली पाहिजे ! – महंत रघुनाथ बाबा महाराज, आगरा, उत्तरप्रदेश

सुभाषचंद्र बोस यांनी जशी ‘आझाद हिंद सेना’ सिद्ध केली होती, तशी आज संतसेना सिद्ध केली पाहिजे, असे प्रतिपादन आगरा येथील महंत रघुनाथ बाबा महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

देश बाह्य आणि अंतर्गत शत्रूंमुळे त्रस्त झाल्याने राष्ट्रकार्य करणार्‍या सनातन संस्थेची आवश्यकता ! – महंत रामजनमदास शास्त्री महाराज, जम्मू-काश्मीर

सध्या आपला देश बाह्य आणि अंतर्गत शत्रूंमुळे त्रस्त झाला आहे. यासाठी राष्ट्रकार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या संस्थेची अतिशय आवश्यकता आहे. हिंदु जनजागृती समितीसुद्धा जेे कार्य करत आहे, ते कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीर येथील महंत रामजनमदास शास्त्री महाराज यांनी येथे केले……….

समष्टीच्या कल्याणाचा विचार करून चालू असलेले सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य ! – महंत मुक्तानंद ब्रह्मचारी, काशी, उत्तरप्रदेश

शंकराचार्यांनी चालू केलेल्या या कुंभमेळ्याच्या माध्यमातून धार्मिक कार्यासमवेत हिंदूंचे सामाजिक संघटनही व्हायला हवे. आपल्या धर्मध्वजाने सहस्त्रो वर्षे सर्वांना संघटित ठेवले आहे.

सनातन संस्था हिंदु धर्मासाठी अद्भुत कार्य करत आहे ! – महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी भास्करानंद महाराज, वृंदावन-मथुरा, उत्तरप्रदेश

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मी नमस्कार करतो. सनातन संस्था सनातन हिंदु धर्मासाठी अद्भुत कार्य करत आहे, असे प्रतिपादन वृंदावन-मथुरा येथील अखंड दयाधामचे महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी भास्करानंद महाराज ….

सनातन संस्थेचे कार्य अद्वितीय आहे ! – श्री श्री १००८ श्री महंत काशीदास महात्यागी महाराज, मुंबई

सनातन संस्थेचे कार्य अद्वितीय असून आपल्यावर देवाची मोठी कृपा आहे. सध्याच्या कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या महापुरुषांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन दहिसर (मुंबई) येथील श्री श्री १००८ श्री महंत काशीदास महात्यागी महाराज यांनी येथे केले.

हिंदूंना जागृत करण्याचे महान कार्य तुम्ही करत असल्याने तुमचा विजय निश्‍चित आहे ! –  स्वामी विज्ञानानंद सरस्वती महाराज

आपल्या गुरुदेवांमध्ये देवच आहे. हिंदूंना जागृत करण्याचे महान कार्य तुम्ही करत आहात. आपला विजय निश्‍चित आहे, असे प्रतिपादन उत्तराखंड राज्याच्या कनखल येथील स्वामी विज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

प्रदर्शनातील ज्ञानातून लोकांच्या विचारात परिवर्तन होईल ! – महंत शंकरानंदजी महाराज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावलेले हे प्रदर्शन सर्वांसाठी चांगले आहे. या प्रदर्शनातील ज्ञानातून लोकांचे विचार परिवर्तन निश्‍चित होणार आहे. यासाठी सर्वांनी संघटितपणे कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन मध्यप्रदेश येथील बहारपुरा मधील सनातन सेवा आश्रमाचे महंत शंकरानंदजी महाराज यांनी येथे केले.

सनातनच्या प्रदर्शनातून हिंदूंमध्ये जागृती होऊन त्यांची उन्नती होईल ! – श्री बलदेवाचार्यजी महाराज, राजस्थान

मी ईश्‍वराच्या चरणी अशी प्रार्थना करतो की, राष्ट्र आणि हिंदु धर्म विकसित होण्यासाठी हिंदूंनी गांभीर्याने चिंतन करून पुढे जायला हवे. धर्मप्रसाराची सेवा झोकून देऊन केल्यास साधकांना मोठे फळ मिळेल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now