
प्रयागराज, २ फेब्रुवारी (वार्ता.) – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनकक्षात अतिशय सुंदर आणि सखोल माहिती देणारे, वैज्ञानिक पद्धतीने समजेल अशा भाषेत शास्त्राचे महत्त्व सांगणारे प्रदर्शन लागले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना करून एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मानवतेसाठी पुढे जाऊन या माध्यमातून व्यापक कार्य होईल, असे प्रतिपादन मथुरेतील रामाश्रम या संस्थेचे पू. अमित कुमारजी यांनी केले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कक्षाला त्यांनी भेट दिली. प्रदर्शन पहिल्यानंतर त्यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याचे पुष्कळ कौतुक केले.

पू. अमित कुमारजी यांनी प्रदर्शनाला सकाळी ९ च्या सुमारास भेट देऊन प्रदर्शन समजून घेतले. या वेळी त्यांनी प्रदर्शनातील आध्यात्मिक संशोधनाच्या काही फलकांची छायाचित्रे काढली आणि नंतर थोड्या वेळाने स्वत: समवेत अनेक साधकांना आणले अन् त्यांनाही प्रदर्शन दाखवले.
आसामच्या श्री ऑनीऑटी सत्राच्या साधकांची प्रदर्शनकक्षाला भेट !
आसाम येथील माजुली येथील ‘श्री ऑनीऑटी सत्र’ या संप्रदायाच्या साधकांनी प्रदर्शनकक्षाला भेट देऊन प्रदर्शनाचे चित्रीकरण केले. आसाम येथील ‘सत्र’ म्हणजे वैष्णव उपासकांची केंद्रे आहेत, ज्यांच्या स्थापना १५ व्या शतकात झाली होती. येथे श्री विष्णुभक्तीसह नृत्य, नाट्य यांचाही सराव केला जातो.