Aaroh Srivastava : महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या समवेत कार्य करू !

आरोह श्रीवास्तव, वैदिक घड्याळाचे निर्माते

आरोह श्रीवास्तव

प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – उज्जैन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या वैदिक घड्याळाच्या प्रचारार्थ श्री. आरोह श्रीवास्तव हे कुंभ येथे आले होते. त्यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या प्रदर्शनकक्षाला भेट दिल्यानंतर कक्षात लावलेल्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे केल्या गेलेल्या परीक्षणाची माहिती त्यांना पुष्कळ आवडली. आम्ही वैदिक घड्याळाच्या संदर्भात अधिक पुढे जाण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या समवेत कार्य करू, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कोण आहेत आरोह श्रीवास्तव ?

आरोह श्रीवास्त यांनी वेदिक घड्याळ्याची निर्मिती केली आहे. जगात सध्या अस्तित्वात असलेले हे एकमेव वेदिक घड्याळ आहे. हे घड्याळ वेदांतील नियमांनुसार चालते. त्यात हिंदूंचे शुभू मुहूर्त आदी दिसतात. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे हे घड्याळ उभारण्यात आले आहे. या घड्याळ्याचे निर्माण करण्यासाठी श्रीवास्तव यांनी हिंदूंच्या अनेक धर्मग्रंथांचा, तसेच ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास केला.