नवी मुंबई – करावे गाव ग्रामस्थांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त करावे गाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या वेळी भारतमाता पूजनानंतर हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी आणि सैन्य दलातील माजी सुभेदार जयसिंग पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी वैद्य उदय धुरी यांनी स्वातंत्र्यासाठी क्रांतीकारकांनी दिलेल्या बलीदानाचे महत्त्व सांगून राष्ट्राप्रतीच्या कर्तव्यांची उपस्थितांना जाणीव करून दिली. तसेच येथे लावलेल्या क्रांतीकारकांच्या फलक प्रदर्शनाची माहिती दिली. हिंदूंमध्ये जागृती निर्माण करून त्यांना संघटित करण्यासाठी ९ फेब्रुवारी या दिवशी हिंदु-राष्ट्र जागृती सभेचे करावे गावातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी-मारुति मंदिर येथे आयोजन केले आहे. या सभेला बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन वैद्य धुरी यांनी या वेळी केले.
या कार्यक्रमासाठी ‘भारत स्टील’चे मालक गोविंद दुबे, बलराज झिरे, प्रवीण पाटील, बाबुराव पाटील, अनंत सातपुते या धर्मप्रेमींनी विशेष परिश्रम घेतले.