
प्रयागराज, २७ जानेवारी (वार्ता.) – धर्मशिक्षण प्रदर्शनातून अध्यात्मप्रसार करून सनातन संस्था मोठ्या मानाने प्रसाराचे विस्तृत कार्य करत आहे. घराघरांत जाऊन सनातन धर्माचे पालन करण्याविषयी सांगणे आवश्यक आहे. सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी सनातन संस्थेने संकल्प केला आहे. सनातन धर्म नसेल, तर एकही घर रहाणार नाही. सर्वांनी एकत्र येऊन आणि संकल्प करून सनातन धर्माचा प्रचार करायला हवा, असे मार्गदर्शन ‘अखिल भारतीय संन्यासी संगमा’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री चण्डालङ्कारा संबागमन्नार रामानूज जीयर यांनी केले. कुंभक्षेत्री लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनास त्यांनी भेट देऊन प्रदर्शन पाहिले. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
श्री चण्डालङ्कारा संबागमन्नार रामानूज यांचे प्रदर्शनाच्या ठिकाणी आगमन होताच सनातनच्या साधिकांनी त्यांचे पाद्यपूजन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी वंदनीय उपस्थित होती. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांना ‘धर्मशिक्षा फलक’ आणि ‘गुरुका आचरण, कार्य एवं गुरुपरंपरा’ हे हिंदी भाषेतील २ ग्रंथ भेट दिले.
श्री चण्डालङ्कारा संबागमन्नार रामानूज जीयर म्हणाले, ‘‘सनातनच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी सेवा करणारे सर्व साधक चांगले प्रयत्न करत आहेत. सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि अखंड भारत देशात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सनातन धर्माचे रक्षण करण्याचा विचार केला पाहिजे. सनातन धर्माचे आचरण करण्यात येणार्या अडचणी दूर करून ते आचरण करण्यासाठी ही संस्था प्रयत्न करत आहे. ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सनातनचा प्रचार करत आहे. सनातन धर्माचे कसे आचरण करायला हवे ? कसे आणि काय बोलायला हवे ? याची माहिती संस्थेद्वारे दिली जाते. त्याविषयी ही संस्था सर्वांना जागृत करून योग्य कार्य करण्यास प्रवृत्त करत आहे.’’
संपादकीय भूमिकासर्वांनी संघटितपणे सनातन धर्माच्या प्रचाराचा संकल्प करून कृती केल्यास ‘हिंदु राष्ट्र’ लवकरच स्थापन होईल ! |