आंब्याच्या पानाचे महत्त्व

इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानात अधिक सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात.

सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी !

ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी.

गुढीपाडव्याचा सण सात्त्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !

सुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्‍यांनाही सात्त्विकता तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.

कडूलिंबाच्या पानाचे महत्त्व

गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्त्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानानंतर कडूलिंबाच्या पानात अधिक असते.