
हडपसर (जिल्हा पुणे), ५ एप्रिल (वार्ता.) – काळेपडळ येथील श्री राधाकृष्ण मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३० मार्च या दिवशी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. या वेळी सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली. श्री. सुधीरचंद्र जगताप यांनी मंदिराबाहेर समाजातील लोकांसाठी उन्हाळ्यामध्ये रांजणातील स्वच्छ आणि थंड पाणी मिळावे, यासाठी ‘राधा राणी पाणपोई’ चालू केली आहे. या पाणपोईचे उद्घाटन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या वेळी माजी सैनिक श्री. सुधीर जगताप यांच्या आई श्रीमती सुभद्रा जगताप, तसेच सियाराम मंदिर शाखेतील, धर्मशिक्षणवर्गातील आणि प्रशिक्षणवर्गातील युवक-युवती हेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक गुढीच्या पूजनानंतर सद्गुरु, संत यांचे मार्गदर्शन झाले.

धर्मशिक्षणवर्गामध्ये आणि राधाकृष्ण मंदिर शाखेमध्ये येणार्या धर्मप्रेमींनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. राधाकृष्ण मंदिराचे विश्वस्त, माजी सैनिक श्री. सुदर्शन जगताप हे नेहमी समितीच्या कार्यक्रमांना मंदिर उपलब्ध करून देतात, समितीच्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो.