भगवान शिवाला चंद्रकलेप्रमाणे म्हणजेच सोमसूत्री प्रदक्षिणा घातली जाते. ‘चंद्राचा अर्थ आहे ‘सोम’ आणि ‘सूत्र’ म्हणजे ‘नाला’. अरघापासून उत्तर दिशेला म्हणजेच सोमाच्या दिशेकडे जे सूत्र जाते, त्याला सोमसूत्र किंवा जलप्रणालिका असे म्हटले जाते. डाव्या बाजूने प्रदक्षिणेला प्रारंभ करून जलप्रणालिकेच्या दुसर्या बाजूला जायचे. त्याला न ओलांडता वळून पुन्हा जलप्रणालिकेपर्यंत यायचे, असे केल्यावर एक प्रदक्षिणा पूर्ण होते. हा नियम केवळ मानवाने स्थापन केलेल्या किंवा मानवाने निर्माण केलेल्या शिवलिंगालाच लागू होते. स्वयंभू लिंग किंवा चल म्हणजेच देवघरात स्थापन केलेल्या शिवलिंगाला लागू होत नाही. (शाळुंकेच्या स्रोताला ओलांडत नाहीत; कारण तेथे शक्तीस्रोत असतो. तो ओलांडतांना पाय फाकतात आणि वीर्यनिर्मिती अन् पाच अंतस्थ वायू यांवर विपरीत परिणाम होतो. देवदत्त आणि धनंजय वायू आखडतात; मात्र ओलांडतांना स्वतःला आवळून ठेवले, म्हणजे नाड्या आखडल्या, तर परिणाम होत नाही.
‘पन्हाळी ओलांडतांना पायाची घाण त्यात पडली आणि तीर्थ म्हणून ते पाणी प्राशन केल्यास भाविकांना व्याधी होतील; म्हणून पन्हाळी ओलांडत नाहीत’, असे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना वाटते !
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शिवाच्या उपासनेमागील शास्त्र’)