स्विडनच्या संसदेबाहेर कुराण जाळले !

स्विडनच्या संसदेबाहेर १४ ऑगस्ट या दिवशी इराकी वंशाच्या सलवान मोमिका यांनी कुराण जाळले. यापूर्वी मोमिका यांनीच २८ जून या दिवशी स्विडनच्या न्यायालयाकडून अनुमती घेऊन एका मशिदीबाहेर कुराण जाळले होते.

‘ओळख श्री ज्ञानेश्‍वरीची’ हा संस्‍कारक्षम उपक्रम अनेक शाळांमध्‍ये यशस्‍वी !

भावी पिढी संस्‍कारक्षम व्‍हावी, तसेच त्‍यांना संत विचारांच्‍या अध्‍यात्‍माची ओळख, आवड निर्माण व्‍हावी, हे ध्‍येय घेऊन हा कार्यक्रम हाती घेतला असल्‍याचे, ‘आळंदी देवस्‍थान’च्‍या वतीने प्रमुख विश्‍वस्‍त योगेश देसाई यांनी सांगितले.

हिंदु धर्माच्या रक्षणासाठी युवकांना प्रेरित करा ! – प्रकाश सिरवाणी, पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख, भारतीय सिंधू सभा

हिंदूंनी आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करायला हवा. धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही, असे उद्गार त्यांनी काढले.

गरोदर महिलांनी ‘रामायण’ आणि ‘सुंदरकांड’ वाचले पाहिजे ! – तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्

जेव्हा महिला गरोदर असते, तेव्हा तिने रामायण आणि त्यामधील सुंदरकांड वाचले पाहिजे. हे जन्माला येणार्‍या मुलासाठी फार चांगले आहेे- तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्

साधना आणि क्षात्रधर्म यांचे समन्वयक गुरु गोविंदसिंह !

शिखांनाही त्यांचे गुरु आणि ज्ञान परंपरा यांवर योग्य पकड ठेवावी लागेल, अन्यथा शीख गुरूंचा बळी घेणारा साम्राज्यवादी हिंसक मतवाद आजही त्याच रांगेत आहे आणि भारतासमवेत जगभरात पसरत आहे.

सोलापूर येथे ‘नित्‍योपासना’ या लघुग्रंथाचे मान्‍यवरांच्‍या उपस्‍थितीत प्रकाशन !

२६ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार भवन येथे मान्‍यवर दत्तभक्‍तांच्‍या उपस्‍थितीत ‘नित्‍योपासना’ या लघुग्रंथाचे प्रकाशन करण्‍यात आले.

समाजवादी पक्षाने माफियांचे पोषण केले; मात्र आम्ही माफियांना नष्ट करू ! – योगी आदित्यनाथ

राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेल पाल याच्या हत्येवरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी विधानसभेत केला होता. त्याच्या उत्तरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते.

कितीही ‘सेक्‍युलरीशाह्या’ (निधर्मीवाद्यांची सत्ता) आल्‍या, तरी त्‍या श्रुति-स्‍मृति पुराणोक्‍ताच्‍या आसपासही फटकू न शकणे !

संस्‍कृतीद्वेष्‍ट्यांचे सहस्रो ग्रंथ हिंदुस्‍थानात, जगातील ग्रंथालयांत आणि विद्यापिठांतून आहेत. आजही तेच शिकवले जातात, तरीसुद्धा आम्‍हा हिंदूजनांच्‍या स्‍वाभाविक अभिरूचीवर त्‍याचा काहीही परिणाम झाला नाही.

संघशक्‍ती निर्माण करणार्‍या शिक्षणाचे महत्त्व !

आपल्‍या देशातील शिक्षणव्‍यवस्‍था ही गुरुकुल पद्धतीची आहे. परकियांनी आक्रमण करून विशेषतः इंग्रजांनी आपली संपूर्ण शिक्षणव्‍यवस्‍था अंतर्बाह्य पालटली.

ग्रंथालय चळवळीला सरकारकडून आर्थिक साहाय्‍याची अपेक्षा ! – डॉ. गजानन कोटेवार, अध्‍यक्ष, राज्‍य ग्रंथालय संघ

साहित्‍य संमेलनामध्‍ये ग्रंथपालाला प्रतिष्‍ठा मिळाली नाही, अद्यापपर्यंत एकाही ग्रंथपालाला राज्‍य पुरस्‍कार मिळालेला नाही; कारण शासनकर्त्‍यांनी ग्रंथांविषयीची संवेदनशीलता गमावली आहे.