गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत ‘सत्सेवा’ आणि कला !
दैनंदिन व्यवहारातील कामांमध्ये आपल्याला भगवंताचा विसर पडतो. सत्सेवेमुळे भगवंताशी अनुसंधान टिकून रहाण्यास साहाय्य होते.
दैनंदिन व्यवहारातील कामांमध्ये आपल्याला भगवंताचा विसर पडतो. सत्सेवेमुळे भगवंताशी अनुसंधान टिकून रहाण्यास साहाय्य होते.
पूर्वी संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, यांसारखे अनेक संत कीर्तनाद्वारे, तसेच भजने आणि अभंग गाऊन भगवंताच्या गुणांचे वर्णन करत. कलेला माध्यम बनवून त्यांनी ईश्वराचा साक्षात्कार अनुभवला.
आज आपण समाजात पहातो की, कला आणि विद्या शिकवणारी अनेक विद्यापिठे अस्तित्वात आहेत. तेथे आपल्याला नोकरी मिळण्याच्या दृष्टीने शिक्षण मिळते; परंतु व्यक्तीच्या लौकिक विकासासमवेत त्याचा पारलौकिक विकास करून घेणारे एकमेव विद्यापीठ म्हणजे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ !
ज्ञानमार्गी कला-उपासकांचे साधनेचे माध्यम ‘सात्त्विक बुद्धी’ हे असते. या सात्त्विक बुद्धीच्या माध्यमातून ते कलेतील सत्-असत्च्या ज्ञानाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात. ज्ञानमार्गी कला-उपासकावर श्री सरस्वतीदेवीची कृपा असते.
कर्नाटकमधील शिल्पकला क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. दगड, सिमेंट, चांदी आणि सोने यांचा वापर करून शिल्पनिर्मिती करण्यात त्यांचे प्राविण्य आहे. मंदिरांच्या गोपुरांच्या बांधकामातही त्यांनी मोठे नाव कमावले आहे.
सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे साधक-चित्रकारांनी ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच ‘साधना’ म्हणून, तसेच स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून काढलेली आहेत.
‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत.
श्रीरामाचा नामजप करत मी माझ्याकडे असलेल्या श्रीरामाच्या एका चित्राप्रमाणे चित्र काढले. ते चित्र काढून पूर्ण झाल्यावर मला वाटले, ‘श्रीरामाच्या कृपेविना मी इतके सुंदर चित्र काढू शकले नसते.
गुरुदेवांचा संकल्प आणि साधकांची भक्ती यांमुळे देवतांची सात्त्विक चित्रे, नामजपाच्या पट्ट्या, सात्त्विक लिपी इत्यादी सनातनच्या कलाकृतींमध्ये ३० टक्क्यांहून अधिक देवतातत्त्व आले आहे. अशा अनेक कलाकृती आपल्याला सिद्ध करायच्या असून त्या समाजाची सात्त्विकता वाढवण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहेत.
कु. गौरी मुद्गल या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा करत आहेत. वर्ष २०१५ मध्ये त्या कोल्हापूर येथे असतांना त्यांनी काढलेली बालकभावातील आध्यात्मिक चित्रे आणि त्यांचा भावार्थ पुढे दिला आहे.