सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीच्या सात्त्विक चित्राची वैशिष्ट्ये

लक्ष्मीतत्त्व ३१.२ टक्के असलेले सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र

स्पंदनशास्त्रानुसार एखाद्या देवतेचे चित्र किंवा मूर्ती तिच्या मूळ रूपाशी जेवढी अधिक मिळती-जुळती असेल, तेवढी त्या चित्रात किंवा मूर्तीमध्ये त्या देवतेची स्पंदने अधिक प्रमाणात आकृष्ट होतात. सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे साधक-चित्रकारांनी ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच ‘साधना’ म्हणून, तसेच स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार काढलेली आहेत. त्यामुळे त्या चित्रांमध्ये त्या त्या देवतांचे तत्त्व (चैतन्य) आले आहे. त्यामुळे ती चित्रे पुष्कळ सात्त्विक बनली आहेत. सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीच्या सात्त्विक चित्रात लक्ष्मीतत्त्व ३१.२ टक्के आहे.

वैज्ञानिक चाचणीत सकारात्मक ऊर्जा आढळणे

देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारे यंत्र, देवतेचे सात्त्विक चित्र आणि सात्त्विक रांगोळी यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने १६.१०.२०१८ या दिवशी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या वेळी सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीच्या सात्त्विक चित्राची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ४.५४ मीटर आढळली.

या ठिकाणी सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीच्या सात्त्विक चित्राची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये दर्शवणारे एका संतांनी काढलेले सूक्ष्मचित्र दिले आहे.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.