सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी जगासमोर ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला !’ हे सूत्र प्रथमच मांडले. या सूत्रानुसार त्यांनी कलासेवेतील साधकांकडून कलाकृतीही सिद्ध करून घेतल्या. गुरुदेवांचा संकल्प आणि साधकांची भक्ती यांमुळे देवतांची सात्त्विक चित्रे, नामजपाच्या पट्ट्या, सात्त्विक लिपी इत्यादी सनातनच्या कलाकृतींमध्ये ३० टक्क्यांहून अधिक देवतातत्त्व आले आहे. अशा अनेक कलाकृती (उदा. ग्रंथांची मुखचित्रे, पंचांग, फलक, हस्तपत्रके, ‘सीडी कव्हर’, छायाचित्रांचे संच तयार करणे, सूक्ष्म-चित्रे, बोधचित्रे, विज्ञापने आदी) आपल्याला सिद्ध करायच्या असून त्या समाजाची सात्त्विकता वाढवण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहेत. याकरिता ‘कोरल ड्रॉ’ आणि ‘फोटोशॉप’ या संगणकीय प्रणालींचे ज्ञान असलेल्यांची तातडीने आवश्यकता आहे. त्यासाठी इच्छुक साधक, वाचक इत्यादींनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून संपर्क करावा.
संपर्क : सौ. भाग्यश्री सावंत
संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०
इ-मेल : kalavibhag@gmail.com