जे.एन्.यू.च्या भिंतींवर ब्राह्मण आणि वैश्य यांच्या विरोधात लिहिण्यात आल्या घोषणा !

सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणार्‍या या विश्‍वविद्यालयाला आता टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे ! केंद्र सरकारने ते धाडस दाखवण्याची वेळ आता आली आहे !

विद्यार्थ्यांसमोर आदर्शांची आवश्यकता ! – सौ. रेणू दांडेकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ

आदर्शांची आवश्यकता ! मुले अनुकरण करतात. आपण चांगले वागलो, तरच हे शक्य आहे. तसेच आपण स्वतःपासूनच पालट घडवायला प्रारंभ केला पाहिजे. माझा विकास म्हणजे दुसर्‍याला त्रास नव्हे, तर सर्वांचा विकास हवा.

तमिळनाडूतील ‘स्मार्त’ ब्राह्मणांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची मागणी फेटाळली !

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अनेक लोक अद्वैत दर्शनाचे पालन करतात. अशा वेळी जर आम्ही स्मार्त ब्राह्मणांना अल्पसंख्यांक दर्जा दिला, तर आपला देश अल्पसंख्यांकांचा देश होईल.

‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांच्यावर अमरावती येथे गुन्हा नोंद !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवे’, असे कुठलेही वाक्य म्हटलेले नव्हते.न बोललेले त्यांच्या तोंडी हेतूपुरस्सर घालण्यात आले आणि बातमी प्रसिद्ध करण्यात आली.

जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते !  – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.) 

ब्राह्मणाचा पुत्र ब्राह्मण आणि क्षुद्राचा पुत्र क्षुद्रच राहील, ही गोष्ट मनुस्मृति नाही, तर भारतीय राज्यघटनेचे जात प्रमाणपत्र सांगते.

व्यक्ती त्याचे कर्म आणि गुण यांमुळे ‘ब्राह्मण’ होतो ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत  

दीड सहस्र वर्षे हिंदु समाजाला मुसलमान समाजाकडून प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या, त्याविषयी पवार कधी काही बोलत का नाहीत ?

(म्हणे) ‘शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरे यांच्याएवढा अन्याय अन्य कुणी केला नाही !’ – शरद पवार

केवळ ब्राह्मण होते; म्हणून दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असलेला संबंध नाकारणे, हे वैचारिक दारिद्य्र होय !

ब्राह्मणांविषयी पसरवण्यात आलेला भ्रम दूर करणे आवश्यक ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.)

ब्राह्मणांनी स्वत: जाती निर्माण केल्या नाहीत, तर त्या काळाच्या ओघात निर्माण झाल्या आहेत; परंतु ब्राह्मणांनीच जाती बनवल्याचे मान्य केले, तरी त्यातून लाभ कुणाचा झाला ?

पुणे पोलिसांनी ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी !

उदयपूरप्रमाणे पुण्यात काही घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.

अभिनेते संजय दत्त कपाळावर टिळा आणि शेंडी ठेवलेल्या खलनायकाच्या भूमिकेत !

खलनायक हे ब्राह्मण, साधू, संत, पुजारी अशा भूमिकेत दाखवून हिंदी चित्रपटसृष्टी अनेक वर्षांपासून हिंदु धर्माची अपकीर्ती करत आली आहे. आता यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.