जे.एन्.यू.च्या भिंतींवर ब्राह्मण आणि वैश्य यांच्या विरोधात लिहिण्यात आल्या घोषणा !

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील (जे.एन्.यू.तील) अनेक इमारतींच्या भिंतींवर आणि परिसरात १ डिसेंबरच्या सायंकाळी ब्राह्मण तसेच वैश्य यांच्या विरोधात घोषण लिहिण्यात आल्या. तसेच ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’च्या इमारतीमध्ये तोडफोडही करण्यात आली. या कृत्यामागे साम्यवादी असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविपने) केला आहे.

भिंतींरील घोषणांत ‘ब्राह्मण परिसर छोडो, रक्तपात होगा’, ‘ब्राह्मण भारत छोडो-बनिया हम तुम्हारे पास बदला लेने आ रहे है’ असे लिहिलेले होते. काही प्राध्यपकांच्या केबिनच्या द्वारावर ‘विश्‍वविद्यालयात येण्यापेक्षा संघाच्या शाखेत जा’ असे लिहिण्यात आले आहे. याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहेत.

संपादकीय भूमिका

  • जे.एन्.यू. विश्‍वविद्यालय हिंदुद्वेषासाठी कुप्रसिद्धच आहे. इतकेच नव्हे, तर तेथून देशविरोधी कारवायाही केल्या जातात, असाही आरोप होतो. साम्यवादी विचारांच्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या घोषणा लिहून समाजात द्वेष पसरवण्याचे काम केले आहे.
  • सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणार्‍या या विश्‍वविद्यालयाला आता टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे ! केंद्र सरकारने ते धाडस दाखवण्याची वेळ आता आली आहे !