तब्बल १० पटींनी भाडेवाढ !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभात मौनी अमावास्येच्या अमृतस्नानासाठी १० कोटी श्रद्धाळू प्रयागराजला येतील, असा अनुमान आहे. देशातील कानाकोपर्यांतून भाविक येथे येत आहेत. त्यामुळे प्रयागराजला येणार्या बस, रेल्वेगाड्या यांमध्ये मोठी गर्दी आहे. विमानांच्या तिकीटांची मागणी १० पटींनी वाढल्यामुळे तिकीटदरही लाखाच्या घरात पोचले आहेत.
✈️ 🚨🛫️ Prayagraj Airfare Hike: ₹1 lakh for a ticket due to Surge Pricing!
💸 10x increase burdens devout Hindus financially
👉 The @MoCA_GoI must step in and regulate airfare hikes.
🔔 Urgent action needed to instruct airlines to reduce fares and make travel affordable!… pic.twitter.com/DrNePodYY8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 28, 2025
चेन्नई ते प्रयागराज या ‘राऊंड ट्रिप’साठी १ लाख ते १ लाख ५० सहस्र रुपयांपर्यंत तिकीट पोचले आहे. २९ जानेवारीला असलेल्या मौनी अमावास्येला चेन्नईहून मुंबईमार्गे (वन स्टॉप फ्लाईट) दुपारी १.१४ वाजता प्रयागराजला पोचणारे विमान ३० जानेवारीच्या दुपारी २ वाजता चेन्नईसाठी परतण्यासाठी निघेल. यासाठी प्रवाशाला तब्बल १ लाख १३ सहस्र रुपये मोजावे लागणार आहेत.
राजधानी देहलीहून प्रयागराजसाठी ‘एअर इंडिया’, ‘अकासा एअर’, ‘इंडिगो’ आणि ‘स्पाईसजेट’ यांसारख्या विमानसेवांचे तिकीट ५० सहस्रांपासून ७० सहस्रांपर्यंत गेले आहे. ‘फ्लेक्सी फेअर’मुळे विमानभाडे एक लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
हे ही वाचा → ♦ Prayagraj Airfare : प्रयागराजला जाणार्या विमानांची भाडेवाढ न्यून करा !
♦ संपादकीय : ‘व्हाईट कॉलर’ पाकीटमार !
अव्वाच्या सव्वा विमानभाडी !
|
संपादकीय भूमिकासर्वसाधारण सश्रद्ध हिंदु जनतेचे आर्थिक कंबरडे मोडण्याचाच हा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने विमानभाढेवाढीवर लगाम लावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! |