Metro Line 8 Approved : मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार !

मुंबई : मुंबईतील सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणार्‍या मुंबई मेट्रो मार्ग ८ च्या उभारणीसाठी राज्य सरकारने अनुमती दिली आहे.

हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्यास तत्त्वतः संमती देण्यात आली आहे. याविषयीचा शासन निर्णय घोषित करण्यात आला आहे.