मुंबई-चिपी विमानसेवा यापूर्वीच झाली आहे बंद !

वेंगुर्ला – खराब हवामानामुळे धावपट्टीवर धुके असल्याच्या कारणाने पुणे-चिपी (सिंधुदुर्ग) विमानसेवा २५ जानेवारीला रहित करण्यात आली. सध्या पर्यटन हंगाम असल्याने विमानसेवा रहित झाल्याचा फटका पर्यटकांना बसला आहे.
गेले ३ महिने मुंबई-चिपी विमानसेवा बंद आहे. अशा परिस्थितीत नियमित सेवा देणार्या ‘फ्लाय ९१’ची पुणे-चिपी सेवा खराब हवामानामुळे रहित करण्याची वेळ आली. पुणे येथून ४५ प्रवाशांना घेऊन हे विमान चिपीकडे येण्यास निघाले; मात्र २५ जानेवारीला खराब हवामानामुळे हे विमान मोपा, गोवा येथे विमानतळावर उतरवण्यात आले आणि तेथून प्रवाशांना चारचाकीने विनामूल्य सिंधुदुर्गात आणण्यात आले. चिपी येथून पुणे येथे जाण्यासाठी विमानतळावर उपस्थित असलेल्या प्रवाशांना विमान रहित झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. खराब हवामानामुळे या विमानतळावर दिवसा येणारी विमाने रहित करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. हे टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी विमान उतरवण्यासाठीची (नाईट लँडिंगची) सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
संपादकीय भूमिकाचिपी (सिंधुदुर्ग) विमानतळाचे भवितव्य धोक्यात ? |