37th National Games : गोव्याने ९२ पदके मिळवून इतिहास रचला !

३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : २७ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३८ कांस्य पदके मिळून एकूण ९२ पदके मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत यजमान गोव्याने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यामुळे स्पर्धेतील राज्यांच्या सूचीमध्ये गोवा ९ व्या स्थानावर पोचला !

धर्मशास्‍त्र समजून घेऊन आचरण करा ! – आनंद जाखोटिया, मध्‍यप्रदेश आणि राजस्‍थान समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती

सध्‍या आपण सणांमागील धर्मशास्‍त्र विसरत चाललो आहोत. त्‍यामुळे सणांचे मूळ स्‍वरूप नष्‍ट झाले असून केवळ मनोरंजनासाठीच सण पहावयास मिळत आहेत.

गोवा : ढवळी येथील श्री भगवतीदेवीच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना

रविवार, ५ नोव्हेंबर या दिवशी कपिलेश्वर पंचायतनातील एक देवता असलेली ढवळी येथील श्री भगवतीदेवीच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

वाहनशुल्कामुळे फेरीबोटींवर होणारा खर्च भरून येईल ! – नदी परिवहन मंत्री फळदेसाई, गोवा

फेरीसेवेच्या अत्याधुनिकीकरणासाठी प्रस्ताव मांडल्यावर महसूल विभागाकडून प्रत्येक वेळी फेरीसेवेतून महसूल मिळत नसल्याचे सूत्र सांगितले जाते. त्यामुळे सामान्य नागरिकांचा खर्च न वाढवता फेरीबोटीतील वाहनांना शुल्क आकारले जात आहे.

उद्या पणजी, वास्को आणि मडगाव रस्त्यांवरील वाहतुकीत मोठे पालट

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे फातोर्डा मैदानात २६ ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी पणजी, वास्को आणि मडगाव रस्त्यांवरील वाहतुकीत मोठे पालट करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘दुर्गामाता दौडी’च्या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर  !

जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अनेक ठिकाणी ‘दुर्गामाता दौड’ काढण्यात आली. या दौडीच्या माध्यमातून हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी इतिहासातून बोध घेऊन कृतीशील होण्याची हाक देण्यात आली.

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी गोवा सिद्ध !

उद्घाटन सोहळ्याला राज्यभरातून १२ सहस्र लोकांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये ५ सहस्र शालेय विद्यार्थी, तसेच स्पर्धेत सहभाग घेणारे खेळाडू आणि इतर पदाधिकारी यांचा समावेश असणार आहे.

नक्षलवादी, हिंदु धर्मद्वेष्टे यांना कायदेशीर मार्गाने विरोध केल्याविना ‘सनातन धर्मरक्षक’ शांत बसणार नाहीत ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतांना ‘मी सर्व धर्मांशी समान वागेन’, अशी प्रतिज्ञा घेतलेली असते; मग ते ‘सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया कसे म्हणू शकतात ?’

गोवा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्वरी येथे विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन

या केंद्रामुळे राज्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे निरीक्षण होईल. शिक्षकांनी काय शिकवले ? विद्यार्थी काय शिकत आहेत ? या गोष्टींच्या नोंदी होतील आणि शिक्षकांनी अध्यापनात सुधारणा करणे आवश्यक असल्यास निर्देश दिले जातील.

गोव्यात ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते औपचारिकरित्या प्रारंभ 

क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने युवकांना मुख्यमंत्र्यांचा संदेश ! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले, ‘‘माझा युवकांना संदेश आहे की, त्यांनी भ्रमणभाषवर खेळण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात खेळावे.’’