हानीग्रस्त द्राक्ष उत्पादकांना भरपाई ! – कृषीमंत्री दादा भुसे

कृषीमंत्री दादा भुसे

मुंबई – नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात १० गावांमध्ये द्राक्ष मण्यांना तडे गेले. २८५ शेतकर्‍यांचे १६८.९० हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांहून अधिक बाधित आहे. अवेळी पावसामुळे फळपीक हानीचे पंचनामे करून ते कृषी विभागाकडे प्राप्त झाले. निधी वितरणासाठी महसूल विभागाची कार्यवाही चालू आहे, त्यांना भरपाई मिळेल, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी विधानसेभत दिली.