भारत जगातील पहिल्या ३ क्रमांकावर पोचेल एवढी क्षमता वाढवण बंदरात !

बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत माहिती

नितेश राणे

मुंबई – पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्यशासनाचा २६ टक्के वाटा आहे. उर्वरित वाटा हा केंद्रशासनाचा आहे. या बंदराची नैसर्गिक खोली २० मीटर आहे. इतकी खोली आपल्या देशात अन्य कोणत्याही बंदराची नाही. त्यामुळे या बंदराच्या विकासानंतर भारत देश जगात पहिल्या ३ क्रमांकावर पोचण्यास साहाय्य होईल, असे विश्वासपूर्ण उत्तर राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दिले. आमदार जयंत पाटील यांनी वाढवण बंदर आणि रस्ते विकास याविषयी २० मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.