नागपूरच्या दंगलग्रस्त भागाच्या पहाणीसाठी काँग्रेसची समिती गठीत

नागपूर – नागपूर येथे १७ मार्चला झालेल्या दंगलीची पहाणी करण्यासाठी काँग्रेसने समिती गठीत केली असून ही समिती दंगलग्रस्त भागाची पहाणी करणार आहे. ही समिती महाराष्ट्रातील शांतता आणि सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी स्थानिकांशी चर्चा करील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कळवले आहे. (दंगल अल्पसंख्यांक धर्मांधांनी केली, हे स्पष्ट असतांना, तसेच त्या संदर्भातील सूत्रधारही धर्मांध असतांना काँग्रेस मात्र जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी, तसेच अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी अशी समिती गठीत करून पहाणी करत आहे. यानंतर ही समिती ‘हिंदूंनीच अल्पसंख्यांकांवर आक्रमण केले’, अशी आवई उठवेल. त्यामुळे खोटे कथानक निर्माण होण्याच्या अगोदरच सरकारने अशा समितीला पहाणी करण्यास बंदी घालावी ! – संपादक) 

या समितीत माजी प्रांताध्यक्ष गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. यशोमती ठाकूर, आमदार साजिद पठाण हे या समितीचे सदस्य असून नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक, तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील समन्वय आहेत.

संपादकीय भूमिका

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याची एकही संधी न सोडणारा काँग्रेस पक्ष !