ठाणे येथे कचरा समस्येविरोधात काँग्रेसचे आंदोलन !
ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्यामुळे कचर्याचे ढीग साचले आहेत.
ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्यामुळे कचर्याचे ढीग साचले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन करतांना म्हणाले की, राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्षे असून अजूनही ते शिल्प सिद्ध करण्याचे काम करत आहेत.
डोंबिवली-महापालिकेच्या कल्याण पूर्व येथील जे प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील पथकप्रमुख भगवान काळू पाटील यांना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबित केले.
ठाणे महापालिकेकडून केंद्र आणि राज्य शासन यांच्या सहकार्यातून भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे. या कामातून वाहतूक केलेल्या आणि विल्हेवाट लावलेल्या मातीच्या (डेब्रिजच्या) ४ सहस्र ६५२ ब्रास परिमाणाचे स्वामीत्वधन (रॉयल्टी) संबंधित ठेकेदारांनी शासनाकडे जमा केले आहे.
कोयता गँग अस्तित्वात नाही, असे सांगितले जात असले, तरी कोयत्याचा धाक दाखवून, तोडफोड करून समाजात दहशत पसरवली जात आहे.
नवी मुंबई पालिकेच्या ठेकेदाराकडून कामगारांना वेळेत वेतन न मिळाल्याने कामगारांनी पालिका मुख्यालयात धरणे आंदोलन केले. त्याची नोंद घेत आयुक्त कैलास शिंदे यांनी २ दिवसांत वेतन न देणार्या ठेकेदारावर कारवाईचे आदेश उपायुक्तांना दिले.
साकोली कॉर्नर येथील श्रीगुरु रामचंद्र महाराज मठात शांतीब्रह्म संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांची पुण्यतिथी म्हणजेच श्री एकनाथ षष्ठी साजरी करण्यात आली. यात सकाळी कीर्तन, दुपारी पुष्पवृष्टी आणि नंतर अधिवक्ता आप्पासाहेब भोसले यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले.
‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली.
पुणे जिल्हा परिषदेचा २९२ कोटी ७५ लाख रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मुख्य वित्त लेखा अधिकारी विशाल पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक गजानन पाटील यांच्याकडे सादर केला.
मुंबईतील सर्वाधिक भव्य सोहळा अशी प्रसिद्धी मिळवलेले राजे फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून शिवजयंतीनिमित्त आयोजित ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ भारत माता चौक येथे पार पडला.