मुसलमान असणार्या सावत्र आईने वडिलांची हत्या करून काढले होते घराबाहेर !

बाराबंकी (उत्तरप्रदेश) : येथे एका किशोरवयीन मुलाची सुंता करून त्याचे धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे. त्याला एका हॉटेलमध्ये काम करायला लावले जात होते आणि त्याचा सतत छळ केला जात होता. त्याला ओलीस ठेवण्यात आले आणि जेवणही दिले गेले नाही. या प्रकरणात विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. सध्या या मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. हा मुलगा मूळचा आझमगडचा आहे.
१. बाराबंकी येथील विहिंपचे जिल्हा संयोजक विनय सिंह राजपूत यांनी सांगितले की, ते पल्हारी चौकात ‘हिंदू मेडिकल स्टोअर’जवळ उभे होते. एक किशोर तिथे आला आणि त्याने प्रथम त्याचे नाव नूर महंमद सांगितले, नंतर त्याने हिंदु नाव सांगितले. यानंतर जेव्हा संशय आला, तेव्हा त्याने सविस्तरपणे माहिती दिली.
२. किशोरने सांगितले की, तो आझमगडमधील अत्रौलियाचा रहिवासी आहे. तो दलित समुदायाचा आहे. त्याच्या आईच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी एका मुसलमान महिलेशी लग्न केले. यानंतर मुसलमान लोक त्याच्या घरी येऊ लागले. त्याच्या सावत्र आईने मालमत्तेसाठी त्याच्या वडिलांची हत्या केली आणि त्याला घराबाहेर हाकलून लावले.
३. याच काळात तो भंगार विक्रेता रियासत अली आणि त्याचा मुलगा मुर्शीद यांच्या संपर्कात आला. दोघांनीही त्याला अनेक महिने समवेत ठेवले आणि विनामूल्य काम करायला लावले. यानंतर नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली मुर्शीद त्याला बाराबंकी येथे घेऊन आला आणि त्याला एका उपाहारगृहामध्ये नोकरी मिळवून दिली. या उपाहारगृहाचे नाव ‘आफिफा रेस्टॉरंट’ आहे. येथे त्याला काम करायला लावले जात होते आणि योग्य जेवणही दिले जात नव्हते.
४. एके दिवशी आफिफा रेस्टॉरंटच्या मालकाने त्याला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले. तो मुलगा म्हणाला की, त्याला कुटुंब नाही. यानंतर हॉटेल मालकाने त्याला रुग्णालयात नेले आणि तेथे त्याची सुंता केली. रेस्टॉरंटमध्ये परतल्यानंतर मालक म्हणाला, ‘आता तू मुसलमान झाला आहेस आणि तुझे नाव नूर महंमद आहे.’ यानंतर त्याने त्याला नमाजपठण करण्यास भाग पाडण्यास चालू केले.
५. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुर्शीद, त्याचे वडील रियासत अली आणि आफिफा रेस्टॉरंटचा मालक यांच्याविरुद्ध धर्मांतर अन् शारीरिक शोषण असा गुन्हा नोंदवला. तसेच मुलाला बालसुधारगृहात पाठवले.
संपादकीय भूमिकाया घटनेविषयी निधर्मीवादी तोंड उघडतील का ? |