पुणे येथे ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’च्या हद्दीपासून काही मीटर अंतरावर आढळली पाकिस्तानी चलनातील नोट !

नॅशनल डिफेन्स अकॅडमी, पुणे

पुणे – मुळशी तालुक्यातील भुकूम येथील ‘स्काय आय मानस लेक’ सिटी सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनाची नोट आढळून आली. हा प्रकार ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’च्या (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) हद्दीपासून काही मीटर अंतरावर घडला. सोसायटीचे अध्यक्ष सहदेव यादव यांच्या निदर्शनास उद्वाहनाच्या बाहेर ही नोट आढळली. त्यांनी तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे.

पाकिस्तानी नोट वापरात असून तिची स्थिती पहाता ती अनेक वेळा वापरण्यात आल्याचे दिसून येते. ही नोट कुणाच्या खिशातून चुकून पडली कि ती अन्य कोणत्या कारणाने येथे आली, याच्या अन्वेषणाची मागणी रहिवाशांनी केली आहे, तसेच सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

संपादकीय भूमिका :

  • एन्.डी.ए. सारख्या संवेदनशील ठिकाणी पाकिस्तानी चलन आढळणे, गंभीर आहे.
  • ही एका मोठ्या संभाव्य धोक्याची चेतावणी असू शकते. त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून योग्य ती कारवाई होणे आवश्यक !