Manipur CM Resigns : मणीपूरचे मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांचे त्यागपत्र

नवी देहली : मणीपूर राज्याचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली आणि त्यांना त्यागपत्र दिले. सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सकाळीच भेट घेतली होती. गेल्या दीड वर्षापासून राज्यात चालू असलेल्या हिंसाचारावरून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात होती.