विशाळगडावरील अतिक्रमणे ३० दिवसांत काढून घ्या !

ही अतिक्रमणे न काढल्यास सरकारी प्राधिकरणाकडून पुढील सूचना न देता बांधकाम पाडले जाईल आणि त्याचा व्यय (खर्च) अतिक्रमणकर्त्यांकडून वसूल केला जाईल, असेही पुरातत्व विभागाच्या वतीने कळवण्यात आलेले आहे.

Delhi CM Resigns : आतिशी यांनी दिले मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र

आम आदमी पक्षाच्या सरकारच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र त्यांनी उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना सादर केले. त्यानंतर उपराज्यपालांनी देहली विधानसभा विसर्जित करण्याची अधिसूचना जारी केली.

प्रियकराला भेटण्यासाठी दुचाकी चोरणार्‍या २ अल्पवयीन मुली कह्यात !

अल्पवयीन मुलींचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असणे लज्जास्पद ! चोर म्हणून निपजणारी पिढी देशाचे भवितव्य काय घडवणार ?

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात दुसरी सामूहिक आरती !

मंदिरांचे पावित्र्यता, धर्म-परंपरांचे जतन करण्याचा भाविकांचा निर्धार !

हिमाचल प्रदेशमधील विद्यार्थ्यांनी दिली महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट !

हिमाचल प्रदेशमधील साधुपुल, शिमला येथील विवेकानंद विद्यानिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ६ फेब्रुवारी २०२५ या दिवशी रामनाथी, गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांचे शिक्षक उपस्थित होते.

प्रवेशपत्रात चूक झालेल्या त्या विद्यार्थ्यांनाही देता येणार बारावीची परीक्षा !

‘विमला गोयंका महाविद्यालया’ने ‘आय.टी.’, ‘कॉम्प्युटर सायन्स’ आणि ‘क्रॉप सायन्स’ या विषयांची मंडळ मान्यता न घेता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांकडून या विषयांचे प्रवेश आवेदन भरून घेतले होते.

३५ तुकडे करून हत्या केलेल्या श्रद्धा वालकर हिच्या वडिलांचे निधन !

आफताबने जंगलात फेकलेल्या श्रद्धाच्या मृतदेहांच्या तुकड्यांपैकी १३ अवशेष देहली पोलिसांना सापडले होते. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विकास वालकर यांनी पोलिसांकडे अन्य अवशेषांची मागणी केली; पण ते अद्याप मिळू शकलेले नव्हते.

माघ एकादशी निमित्त ४ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले श्री विठ्ठलाचे दर्शन !

माघ शुक्ल जया एकादशीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा पार पडली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ; तर रुक्मिणीमातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.

Nepal Hindus Conversion Under Social Work : १७ अमेरिकी आणि १ भारतीय हे नेपाळमध्ये हिंदूंचे करत होते धर्मांतर !

ख्रिस्ती मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असतांना आता संपूर्ण देशात हिंदूंनी धर्मांतरित झालेल्या हिंदूंना परत स्वधर्मात घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवणे आवश्यक आहे !

अमेरिकेत दारूच्या नशेत गाडी चालवून २ मुलांना चिरडणार्‍या भारतीय वंशाच्या व्यक्तीला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

भारतात कधी अशी शिक्षा होते का ? राजकारणी, अभिनेते, वलयांकित व्यक्ती आदींना तर कधीच शिक्षा होत नाही !