खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
धुळे – ‘खान्देशा’चे खरे नाव ‘कान्हादेश’ आहे, असा उल्लेख महाराष्ट्र सरकारच्या गॅजेटमध्ये आहे. याविषयीचे पुरावे इतिहासात सापडतात. त्याला पौराणिक संदर्भसुद्धा आहेत. यामुळे खान्देश हे नाव पालटून ‘कान्हादेश’ असे करावे, अशी मागणी खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना देण्यात आले. भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनीही असे म्हणण्याचे आव्हान केले आहे. खान्देश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर विठ्ठल भोकरे, कार्याध्यक्ष डॉ. भास्कर लक्ष्मण पाटील, उपाध्यक्ष हिरामण विठ्ठल गवळी, सचिव सुनील भालचंद्र वाघ, नारायण पाटील, प्रकाश विभांडिक, कैलास जहागीरदार पवार आदींनी जिल्हाधिकार्यांची भेट घेत निवेदन दिले.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? |