नाशिक – आडगाव येथून शहर पोलिसांनी ८ बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे. हे नागरिक अवैधरित्या भारतात आल्याचे उघड झाले आहेत. त्यापैकी तिघांकडे आधारकार्ड आणि रहिवासी दाखला आढळून आला आहे. हे दाखले संशयितांनी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून काढल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने अन्वेषण चालू केले आहे.
पोलिसांच्या अन्वेषणात, आलीम मंडल, अलअमीन शेख आणि मोसीन या तिघांकडे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील कोळीमळा, भुजबळ चाळ येथील रहिवासी दाखल मिळाला, तसेच या पत्त्याच्या आधारेच संशयितांनी आधारकार्ड काढल्याचे उघड झाले आहे. संशयितांनी ग्रामपंचायतीतील एका महिलेस हाताशी धरून आधारकार्ड काढल्याचे समोर आले आहे. ते पैशांसाठी भारतात आले, असे त्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी पकडलेले ८ जण हे बांगलादेशातील खुलना राज्यातील आहेत. ८ पैकी सुमन गाझी हा पुणे आणि नाशिकमध्ये गेल्या १२ वर्षांपासून रहातो. सर्वजण अवैधरित्या भारतात आलेले आहेत.
संपादकीय भूमिका
|