जिहाद्यांनी सद्गुरु बाळ महाराज यांना दिलेल्या धमक्यांविषयी कारवाई करून महाराजांना संरक्षण द्या !

राहुल आवाडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देतांना भाजपचे आमदार राहुल आवाडे (उजवीकडे)

नागपूर – १० डिसेंबरला इचलकरंजी शहरात बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ ‘हिंदु न्याय यात्रा’ झाली. यात योगी संतोष उपाख्य सद्गुरु बाळ महाराज यांचे मार्गदर्शन झाले. यातील त्यांच्या बांगलादेशी मुसलमानांविषयी केलेल्या भाषणाचा विपर्यास करून काही जिहादी एम्.आय.एम्. पक्षाचे कार्यकर्ते यांनी ‘बाळ महाराज ‘आर्.एस्.एस्.’का पिल्लू है, यांना आम्ही ठेचणार आहोत, ‘आर्.एस्.एस्.’ देशाला लागलेला कर्करोग आहे’, असा आशय असलेला ‘व्हिडिओ’ सिद्ध केला असून योगी संतोष उपाख्य सद्गुरु बाळ महाराज यांना जिवे मारण्याची धमकी देऊन हिंदु समाजात दहशत पसरवत आहेत. तरी धर्मांध जिहाद्यांनी सद्गुरु बाळ महाराज यांना दिलेल्या धमक्यांविषयी कारवाई करून महाराजांना संरक्षण देण्यात यावे, या मागणीचे निवेदन इचलकरंजी येथील भाजप आमदार राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

हातकणंगले (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यात निवेदन देतांना आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांचे कार्यकर्ते

कोल्हापूर – याच मागणीचे निवेदन आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने हातकणंगले (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यात देण्यात आले. या प्रसंगी सर्वश्री संतोष हत्तीकर, दत्ता पाटील, पंढरीनाथ ठाणेकर, सागर कुंभार, विक्रम सुतार यांसह अन्य उपस्थित होते.