वडूज (सातारा) – येथील येरळा नदीकाठावर असलेल्या श्री तारकेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगाची विटंबना केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास कह्यात घेतले आहे. अजय सोमलाल इवनाती (वय ३० वर्षे) रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश असे संशयिताचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याविषयी वडूज येथील सुशांत कृष्णा पार्लेकर यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीमध्ये म्हटले आहे, सुशांत पार्लेकर, राहुल व्होरा आणि हरिश्चंद्र जाधव हे श्रीतारकेश्वर महादेव मंदिराचे सेवेकरी म्हणून काम पहातात. १६ डिसेंबर या दिवशी सकाळी अज्ञात व्यक्तीने मंदिरातील साहित्य अस्ताव्यस्त केल्याचे त्यांना समजले. पार्लेकर मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी मंदिराच्या दरवाजाची तोडफोड करण्यासोबतच कापराचे कागद, फुले, त्रिशूळ, डमरू, कचरा टाकून ते अर्धवट जळलेले स्थितीत दिसले. तसेच दैनंदिन वापरातील पूजेचे साहित्य मंदिरामध्ये अस्ताव्यस्त टाकण्यात आले होते. मंदिर परिसरामध्ये भाविकांनी शोध घेतला असता एक अनोळखी व्यक्ती आढळली, तिला पोलिसांकडे सोपवल्यावर संबंधित युवक हा मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संपादकीय भूमिकामंदिरांमध्ये विटंबना करण्याचे कुणाचेही धाडस होऊ नये, असा धाक निर्माण व्हायला हवा ! |