‘इस्‍कॉन’चे चिन्‍मय कृष्‍णदास प्रभु यांच्‍या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत ! – आमदार राज सिन्‍हा, धनबाद, भाजप

बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांक हिंदूंच्‍या रक्षणासाठी आंदोलन करणार्‍या ‘इस्‍कॉन’चे चिन्‍मय कृष्‍णदास ब्रह्मचारी यांची सुटका आणि तेथील हिंदूंची सुरक्षा यांसाठी भारत सरकारने हस्‍तक्षेप करावा, अशी मागणी आवाहन धनबादमधील भाजप आमदार राज सिन्‍हा यांनी केले.

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ शिवसेनेचे (उबाठाचे) आंदोलन

बांगलादेशात हिंदूंवर मुसलमान कट्टरतावाद्यांकडून अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. हिंदू महिलांवर अत्याचार केले जात आहे. ही गोष्ट अत्यंत दु:खदायक आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो.

सनातन संस्‍थेच्‍या वतीने रांची (झारखंड) येथे साधनाविषयक प्रवचन पार पडले !

सनातन संस्‍थेच्‍या वतीने येथील चाईबासा भागात साधनाविषयक प्रवचनाचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी सनातनच्‍या साधिका सौ. पूजा चौहान यांनी उपस्‍थित जिज्ञासूंना सांगितले, ‘‘पूजा, आरती, भजन इत्‍यादी उपासनेच्‍या प्रकारांतून देवतत्त्वाचा लाभ मिळतो…

१४ कोटी रुपये खर्चूनही शिरवल, केर ते भेकुर्ली रस्त्याची दुरवस्था

ही दुरवस्था होण्याला उत्तरदायी असणार्‍यांवर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे !

सत्तरी तालुक्याच्या विकासाला सरकारकडून पूर्ण सहकार्य ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा

सत्तरीच्या विकासाला सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्यात आले असून यापुढेही सत्तरीतील विकासकामे गतीने होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

ध्वनीप्रदूषणासंबंधी अवमान याचिकेवरील सुनावणी १३ डिसेंबरपर्यंत स्थगित

पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी निष्क्रीय असल्यानेच ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात लोकांना स्वखर्चाने न्यायालयीन लढा द्यावा लागतो !  

सातारा पोलिसांना १७ नवीन वाहने !

सातारा जिल्‍हा पोलीस दलाच्‍या ताब्‍यात ४ पी.सी.आर्. आणि १३ दुचाकी अशी १७ नवीन वाहने उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहेत. यामुळे जिल्‍ह्यातील वाढत्‍या चोरांना आळा बसण्‍यासाठी साहाय्‍य होईल.

आज संघटित झालो नाही, तर भविष्‍यात एकत्र येणे अशक्‍य होईल ! – सौ. मीनाक्षी पाटील, इस्‍कॉन, पेण

चिन्‍मय कृष्‍णदास प्रभु यांच्‍या अटकेच्‍या निषेधार्थ हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समितीच्‍या वतीने पेण येथे आंदोलन !

बांगलादेशातील हिंदूंवरील अन्‍यायाच्‍या विरोधात ठाणे येथे सहस्रो हिंदूंचा मूक मोर्चा !

हिंदु समाजाचा मूक मोर्चा म्‍हणजे जागृती आणि चेतावणी आहे, असे विधान भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केले, तर भाजपचे आमदार अधिवक्‍ता निरंजन डावखरे यांनी ‘देश सुरक्षित ठेवायचा असेल, तर अशाच प्रकारे आपण एकत्र रहायला हवे’

काश्‍मिरी हिंदूंच्‍या वंशविच्‍छेदाविषयी मुफ्‍ती कुटुंबियांना कधी लाज वाटली का ? – हिंदु जनजागृती समिती

गेली अनेक वर्षे श्रीनगरमधील लाल चौकात दिवसाढवळ्‍या भारताचा राष्‍ट्रध्‍वज जाळला जात होता, त्‍या वेळी कधी मुफ्‍ती कुटुंबियांची मान शरमेने खाली गेली का ?